‘बिग बॉस’ हा कायमच चर्चेत राहिलेला शो आहे. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वाची जोरदार चर्चा रंगते. त्याचबरोबर प्रत्येक पर्वातील स्पर्धकांचीदेखील चर्चा रंगते. अशातच ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाचीही सध्या जोरदार चर्चा होत आहे आणि यातील स्पर्धक व YouTuber अरमान मलिकही सध्या चांगलाच चर्चेत आहे. जेव्हापासून अरमान मलिक ‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये सहभागी झाला आहे, तेव्हापासून तो कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यात त्याच्या चाहत्यांना अधिकच रस आहे. चला तर जाणून घेऊयात अरमान मलिकच्या एकूण संपत्तीबद्दल…
सिद्धार्थ कन्ननबरोबरच्या संभाषणात अरमान मलिकने सांगितले की, त्याची एकूण संपत्ती १०० ते २०० कोटी रुपये आहे. हे पैसे त्यांचे आणि त्यांच्या दोन पत्नींचे असल्याचे त्यांनी गंमतीने सांगितले. अरमानचे चंदिगडमध्ये आलिशान घर आहे. याशिवाय चंदिगडमध्ये त्याचे तब्बल ३५,००० स्क्वेअर फुटांचे प्राण्यांचे फार्मही आहे. हे फार्म प्राणी त्याचे प्राणी प्रेमाबद्दलचे दर्शन घडवते. अरमानला अभिमान आहे की, तो कोणाकडूनही पैसे न घेता केवळ त्याच्या YouTubeच्या कमाईतूनच शेती करतो. त्यांनी शेतात राबणाऱ्या प्राण्यांसाठी पाच डॉक्टर आणि ६ मजुरांची टीमही ठेवली आहे, जे त्यांची काळजी घेतात.
अरमान मलिकने खुलासा केला की, त्याच्या इमारतीतील एकूण दहा अपार्टमेंटपैकी सहा त्याच्या टीम आणि कर्मचाऱ्यांसाठी आहेत. या सहा अपार्टमेंटपैकी एका अपार्टमेंटचे संगीत स्टुडिओमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. यावरुन त्याला असलेली गाण्याची आवडदेखील दिसून येते. त्याने सांगितले की, त्याच्या टीममध्ये एकूण सहा एडिटर, तीन-चार कॅमेरामन, दोन ड्रायव्हर, चार सुरक्षा कर्मचारी आणि नऊ घरगुती मदतनीस यांचा समावेश आहे, हे सर्व या सहा अपार्टमेंटमध्ये राहतात.
दरम्यान, अरमानच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे एकूण तीन अलिशान व महागड्या कार आहेत. याशिवाय त्यांनी सांगितले की, त्यांच्या टीम सदस्यांकडे त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक कारदेखील आहेत. ज्या त्यांना अरमानने स्वत: दिल्या आहेत. याशिवाय त्याच्या मुलाला शाळेत जाण्यासाठीही एक महागडी कार आहे.