मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी म्हणजे शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे. शिवानी व अजिंक्य बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. १ फेब्रुवारी रोजी शिवानी व अजिंक्य यांचा शाही विवाहसोहळा झाला. शिवानी व अजिंक्यच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. लग्नानंतर ही जोडी चर्चेत असलेली पाहायला मिळाली. लग्नानंतर ही जोडी अनेकदा एकत्र एन्जॉय करताना दिसली. लग्नानंतर शिवानी व अजिंक्य त्यांचे लग्नांनंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसले. (Ajinkya Nanaware and Shivani Surve)
सध्या अजिंक्य ननावरे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत तो अद्वैत ही भूमिका साकारत आहे. त्याच्या अद्वैत या भूमिकेलाही प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. सोशल मीडियावरही अजिंक्य बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच सध्या अजिंक्य त्याच्या शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत फिरायला गेला असल्याचं पाहायला मिळत आहे.
अजिंक्यने त्याच्या बाईक रायडींगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये अजिंक्य एकटाच बाईक राईडचा आनंद लुटताना दिसत आहे. या व्हिडीओला त्याने ‘सेफ राईड’ असं कॅप्शन दिलं आहे. अजिंक्यच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शिविली आहे. शिवाय अजिंक्यच्या या पोस्टवरील शिवानीच्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. शिवानीने अजिंक्यला दम दिलेला या कमेंटमध्ये दिसत आहे. शिवानीने या पोस्टवर कमेंट करत, “मी तुला नको म्हटलं ना”, असं म्हटलं आहे. यावर अजिंक्यने पुन्हा प्रतिउत्तर देत ‘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’, असं म्हटलं आहे.
शिवानी छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ मालिकेमुळे व ‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे प्रसिद्धीझोतात आली. सध्या शिवानी ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. तर अजिंक्य सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत आहे. अजिंक्य मालिकेच्या चित्रीकरणातून ब्रेक घेत बायकोसहही वेळ घालवताना दिसतो.