कलाकार मंडळी अभिनयाबरोबरच त्यांच्या आवडीनिवडी जोपासताना दिसतात. बरीचशी कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयाच्या आवडीबरोबरच व्यवसाय क्षेत्रातही कार्यरत असतात. असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयाबरोबरच व्यावसायिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. अशातच आता आणखी एका मराठमोळ्या संगीतकार व दिग्दर्शकाने नव्या व्यवसायात पदार्पण केले आहे. सोशल मीडियावरुन त्यांनी याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे. (Saleel Kulkarni New Hotel)
सलील यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. अलीकडेच त्यांनी त्यांच्या या नव्या हॉटेलचं उद्घाटन केलं असून त्यांनी कुटुंबीयांबरोबर एक फोटोही शेअर केला आहे. टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर सलील यांनी सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्यांनी पुण्यातील बँगलोर कँटीन या हॉटेलची चव त्यांना विशेष आवडली असल्याचं सांगितलं. त्याठिकाणचा डोसा व कॉफी पिऊन त्यांना असे वाटलेले की यामध्ये आपलाही सहभाग हवा. म्हणून ते आता ‘बँगलोर कँटीन’ या व्हेंचरशी जोडले गेले आहेत. त्यांनी या हॉटेलची नवीन शाखा सिंहगडच्या खाऊगल्लीमध्ये सुरु केली, असल्याचं सांगितलं.

यानंतर आता त्यांनी या त्यांच्या नव्या ‘बॅंगलोर कँटीन’चं उदघाटन केलं असल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियावरुन स्टोरी शेअर करत त्यांनी याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे. उद्घाटनावेळचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, “लहानपणी आई आम्हाला डोसा खायला घेऊन जायची. काल आम्ही तिच्या हस्ते बँगलोर कँटीनचं उद्घाटन केलं. नक्की भेट द्या सिंहगड रोड खाऊगल्ली येथील बँगलोर कँटीनला”.
सलील यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी संगीताविषयी प्रचंड प्रेम आहे. सलील यांचा संदीप खरे यांच्याबरोबरचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत असतो. तर सलील यांनी ‘वेडिंगचा शिनेमा’, ‘एकदा काय झालं’ अशा गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये ‘एकदा काय झालं’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कारही त्यांना मिळाला.