‘बिग बॉस’ हा कायमच प्रेक्षकांचा मनोरंजन करणारा शो आहे. यात येणाऱ्या अनेक ट्विस्टमुळे प्रेक्षक या शोचे चाहते आहेत. या शोमधील अरमान मलिक हा स्पर्धक आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत राहीला आहे. या शोमध्ये त्याच्याबरोबर त्याच्या दोन पत्नींदेखील सहभाग घेतला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्याची पहिली पत्नी पायल मलिक ही घराबाहर पडली. मात्र तिने नुकताच ‘वीकेण्ड का वार’मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी तिने विशाल पांडेवर कृतिका मलिककडे वाईट नजरेने पाहण्याचा आरोप केला.
पायल मलिकने अनिल कपूरला सांगितले की, ‘बिग बॉस’मध्ये काय चालले आहे हे सांगण्यासाठी ती येथे आले आहे आणि ती खूप निराश आहे. विशाल पांडेशी बोलताना पायल म्हणाली की, “तुम्ही कॅमेऱ्यात काहीतरी बोललात जे माझ्या मते खूप चुकीचं होतं. तुम्ही कृतिकाबद्दल जे बोललात ते मला मान्य नाही. ती एक आई आणि एक पत्नी आहे आणि आपण तिचा आदर केला पाहिजे. तू कृतिकाबद्दल जे बोललास ते चुकीचे आहे.” पायल व अरमानसह शोचे होस्ट अनिल कपूर यांनी विशालला फटकारले.
अनिलने लवकेश कटारियाला विचारले असता, विशालने त्याला सांगितले की, “विशाल मला कृतिका भाभी खूप आवडतात” असं म्हटलं. यानंतर विशालने मी हे चुकीच्या पद्धतीने बोललो नसल्याचे सांगत राहिला. यावर पायल म्हणाली की, जर तो ‘दोषी’ नव्हता तर त्याने थेट कृतिकाला सांगण्याऐवजी लवकेशच्या कानात ही कुजबुज का केली?”
पायल गेल्यानंतर अरमान विशालशी या प्रकरणाबद्दल बोलायला गेला. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर अरमानचा संयम सुटला आणि त्याने विशालला कानाखाली मारली. नंतर तो आरडाओरडा करताना दिसला. विशाल आणि अरमान दोघेही एकमेकांकडे धावण्याचा प्रयत्न करताना दिसले. पण इतर स्पर्धक त्यांना एकमेकांपासून दूर ढकलत होते.
दोघांच्या या बाचाबाचीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात भांडणाची परवानगी नाही. कोणत्याही स्पर्धकाने असे केल्यास त्याला घराबाहेर हाकलून दिले जाते. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ अरमान मलिकवर काय कारवाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.