आपल्या आस पास आपण पाहतो अनेक मालिका, चित्रपट प्रेक्षक अगदी मन लावून पाहत असतात. कधी कधी या मालिकां मधील काही घटनांना नाहक ट्रॉलिंगला सामोरं जावं लागत. जेवढी मालिकेची लोकप्रियता तेवढाच ट्रॉलिंगचा सामना देखील मालिकेला करावा लागतो. अशीच लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते. आई कुठे काय करते ही मालिका दीर्घ काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेचं कथानक एका स्त्रीची आई म्हणून, बायको म्हणून किंवा सून, मुलगी म्हणून होणारी धावपळ किंवा या बाबती स्त्रियांचं महत्व अधोरेखित करणार आहे.(Anirudh’s new partner)
एका स्त्री ने दुसरं लग्न करणं या वर भाष्य करत मालिकेने एक नवीन वळण घेतलं आणि मालिकेतील प्रमुख नायिका अरुंधतीच दुसरं लग्न ही थाटात पार पडलं. अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नानंतर अनिरुद्धची सततची चिडचिड कथानकात दिसू लागली आहे.
संजना आणि अनिरुद्ध एकत्र असून देखील अनिरुद्धला अरुंधतीच दुसरं लग्न पटलेलं नाही. यावर देखील बऱ्याच प्रेक्षकांनी आक्षेप घेतलेले पाहायला मिळाले. पण मालिकेत आता एक वेगळंच वळण कदाचित प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनिरुद्ध आणि संजनाचं देखील आता फारसं पटताना दिसत नाहीये.

अनिरुद्ध ने त्याचा नवीन बिझनेस सुरु केला आहे पण या बिझनेस मध्ये अनिरुद्धचा नवीन पार्टनर देखील असल्याचं दिसत आहे. मालिकेच्या एका प्रोमो नुसार अनिरुद्ध त्याच्या बिझनेस पार्टनर ला घरातील गोष्टी सांगत असतो यावर संजना चिडून त्याला विचारते कि घरातील गोष्टी बाहेरच्या कोणाला सांगण्याची गरज काय यावर अनिरुद्ध अनेक कारण देऊन उत्तर टाळतो. तर आधी अरुंधती नंतर संजना आणि आता नवीन बिझनेस पार्टनरच्या रूपात अनिरुद्धच्या आयुष्यात अजून कोण येणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तर आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहून उत्सुकतेच ठरणार आहे.(Anirudh’s new partner)