शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रशस्त वाडा, सुंदर देवघर अन्…: असा आहे ‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेचा सेट, पाहा Inside Video

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 5, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
zee marathi new serial lakhat ek amcha dada set bts video know more

प्रशस्त वाडा, सुंदर देवघर अन्...: असा आहे ‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेचा सेट, पाहा Inside Video

झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सुरु होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे नवनवीन जबरदस्त प्रोमो प्रदर्शित होत आहेत. या मालिकेतून ‘लागिरं झालं जी’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता नितीश चव्हाण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमधली उत्सुकता वाढली आहे. या नव्या मालिकेत झळकणाऱ्या बऱ्याच कलाकारांची नावं समोर आली आहेत. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत ‘झी मराठी’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार आहे. ‘लागिर झालं जी’ फेम नितीश चव्हाण या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार असून त्याच्या पात्राचे नाव सूर्या दादा असं आहे.

नुकतंच साताऱ्यात या मालिकेचे दणक्यात प्रमोशन पार पडले. ढोल-ताशांच्या गजरात ‘सूर्या दादा’चे स्वागत झाले. यावेळी नितीश चव्हाणने सूर्या दादा या त्याच्या पात्राच्या भव्य ३० फूट प्रतिमेचं अनावरण केले. यावेळी त्याच्या लाडक्या बहिणी उपस्थित होत्या. सातारकरांनी हे क्षण साक्षात अनुभवले,  शिवाय प्रेक्षकांनाही हा सोहळा पाहता येणार आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा सेट हा अगदी भव्यदिव्य असून हा सेट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नक्की काय काय आहे या सेटवर. चला जाणून घेऊयात…

आणखी वाचा – कधीही स्वयंपाकघरात न गेलेल्या शिवाची अशी होतेय तारांबळ, सिलेंडरही उचलला अन्…; मालिकेचा BTS व्हिडीओ समोर

‘लाखात एक आमचा दादा’ या सेटवर एक भव्य वाडा असून या वाड्याला हार फुलांनी सजवला आहे. तसेच या वाड्याचे दार हे केळींच्या पानांनी सजवलं आहे. तसेच या वाड्यामध्ये भव्य असा देव्हारा असून हा देव्हारा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. देव्हाऱ्यात दत्तगुरु, गणपती, स्वामी समर्थ, तुळजा भवानी, ज्योतिबा अशा अनेक देवांची प्रतिमा आहेत. तर देव्हाऱ्याच्या मध्यभागी देवीची मूर्ती आहे. तसेच आजूबाजूला अनेक देवांच्या मूर्त्त्या आहेत. त्याचबरोबर घरातील खोल्याही अगदी आकर्षक आहेत., उत्तम रंगसंगती व आकर्षक अशा वस्तूंनी या खोल्या सजवल्या आहेत.

आणखी वाचा – प्रथमेशने लग्नातील ‘ती’ गोष्ट अजूनही ठेवली आहे जपून, खास व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाला, “वरमाला…”   

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण सूर्यादादाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. एक भाऊ आणि चार बहिणी यांच्या भोवती फिरणारी या नव्या मालिकेची कथा आहे. अभिनेत्री कोमल मोरे (तेजश्री), समुद्धी साळवी (धनश्री), इशा (राजश्री), जुई तनपुरे (भाग्यश्री) या चारजणी बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहे. ८ जुलैपासून रात्री साडे आठ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.       

Tags: Lakhat Ek Amcha Dadamarathi entertainment newsnew serial
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
06 july 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

शनिवारी ‘या’ राशींवर असणार शनिदेवाची विशेष कृपा, तुमच्यासाठी कसा असणार हा दिवस? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.