हल्लीच्या जगात एक गोष्ट मिळणं अतिशय भाग्याचं मानलं जातं ते म्हणजे योग्य जोडीदार मिळणं. आपल्याला हवा असणारा, समजून घेणारा साथीदार मिळणं हे खूप गरजेचं असत. मंडळी आपण चित्रपट, मालिका यांमध्ये आपल्या लाडक्या कलाकारांना कथेनुसार एकमेकांच्या प्रेमात पडलेलं, लग्न झालेलं पाहतो पण खऱ्या आयुष्यात आपल्या आवडत्या कलाकाराला समजून घेणार नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी ही प्रेक्षक वर्ग तितकाच आतुरलेला दिसतो.(Amit Rekhi Shivani Naik Relation)
पडद्यावर दिसणारे असेच २ कलाकार आहेत जे वेगवेगळ्या वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येत असले तरी खऱ्या आयुष्यात ही ते एकमेकांचे पार्टनर असल्याचं दिसत आहे. कलाकारांची ही जोडी म्हणजे अभिनेता अमित रेखी आणि अभिनेत्री शिवानी नाईक. अमित हा कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या लोकप्रिय ,मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे तर शिवानी ही झी मराठी वाहिनी वरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

हे देखील वाचा – ‘पॅरिसमध्ये असताना अनिकेत वर हल्ला झाला होता आणि…..’अशोक सराफ यांनी सांगितला मुलासोबत घडलेला तो प्रसंग!
नुकताच शिवानीचा वाढदिवस होता त्या निम्मित अमित ने तिच्या सोबत एक फोटो पोस्ट करत ‘happy birthday #partner ‘ असं लिहीत शुभेच्छा दिल्या होत्या. तर अमितची ही स्टोरी पाहून प्रेक्षकांना हे दोघ खरचं एकमेकांचे लाईफ पार्टनर आहेत का किंवा होणार आहेत का हा प्रश्न पडलेला दिसतोय.

अमित हा भाग्य दिलेले तू मालिकेत सानियाचा म्हणजेच अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या नवऱ्याची भूमिका साकारत आहे सानिया जरी मालिकेत नकारात्मक भूमिकेत असली तरी च आदित्य वर प्रेम असल्याचं दिसत आहे तर दुसरीकडे अप्पीच स्वप्न पूर्ण होऊन ती कलेक्टर झाल्याचं दिसत आहे.(Amit Rekhi Shivani Naik Relation)