नाटक, मालिका, चित्रपट व रिॲलिटी शोज यासारख्या अनेक माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय असलेल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या अनेक विनोदी कार्यक्रमांतून विशाखा यांनी त्यांच्या विनोदी अभिनयाची छाप सोडली आहे. विशाखा यांनी पोट धरुन हसवणाऱ्या विनोदी भूमिकेसह, राग व चीड येईल अशी खलनायिकाही उत्तमरित्या निभावत आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत त्या साकारत असलेल्या ‘रागिणी’. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्या नेहमीच विविध फोटोज व रील्स शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
विशाखा सुभेदार या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या आपले अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे कामाबद्दची काही माहितीही देत असतात. अशातच त्यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो त्यांच्या चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे. विशाखा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विशाखा एका “जाड असून पण सुंदर दिसते. या गोष्टीचा लय माज आहे” हा संवाद त्यांच्या शैलीत बोलत आहेत. त्यानंतर ड्रीमगर्ल या गाण्यावर त्या नाचत आहेत.
त्याचबरोबर या व्हिडीओखाली “मी अशी आहे तर आहे.. जाड” असं म्हटलं आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे, या व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “क्या बात ही ताई, खूपच सुंदर, खरंच खूप सुंदर दिसता तुम्ही, छान व्हिडीओ, तुम्ही जशा आहात तशा भारीच दिसता, तुम्ही जशा आहात तशाच आम्हाला आवडता” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – मेष, कर्क व मीन राशींसाठी बुधवारचा दिवस असेल शुभ, आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या…
दरम्यान, विशाखा यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोनंतर त्या नाटक व मालिकांकडेव वळल्या. सध्या त्या रंगभूमीवरील कुर्रर्रर्र नाटकात काम करत आहेत. तसेच त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह या मालिकेतूनही खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.