रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “जाड आहे या गोष्टीचा…”, विशाखा सुभेदारांच्या ‘त्या’ व्हिडीओची चर्चा, नेटकरीही कमेंट करत म्हणाले, “तुम्ही जशा आहात…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 3, 2024 | 10:36 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Vishakha Subhedar shared a video on Instagram saying i am fat

Video : “जाड आहे या गोष्टीचा...”, विशाखा सुभेदारांच्या ‘त्या’ व्हिडीओची चर्चा, नेटकरीही कमेंट करत म्हणाले, “तुम्ही जशा आहात...”

नाटक, मालिका, चित्रपट व रिॲलिटी शोज यासारख्या अनेक माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय असलेल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या अनेक विनोदी कार्यक्रमांतून विशाखा यांनी त्यांच्या विनोदी अभिनयाची छाप सोडली आहे. विशाखा यांनी पोट धरुन हसवणाऱ्या विनोदी भूमिकेसह, राग व चीड येईल अशी खलनायिकाही उत्तमरित्या निभावत आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत त्या साकारत असलेल्या ‘रागिणी’. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्या नेहमीच विविध फोटोज व रील्स शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

विशाखा सुभेदार या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या आपले अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे कामाबद्दची काही माहितीही देत असतात. अशातच त्यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो त्यांच्या चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे. विशाखा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विशाखा एका “जाड असून पण सुंदर दिसते. या गोष्टीचा लय माज आहे” हा संवाद त्यांच्या शैलीत बोलत आहेत. त्यानंतर ड्रीमगर्ल या गाण्यावर त्या नाचत आहेत.    

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

आणखी वाचा – ‘ते’ सांकेतिक वाक्य रुपालीला समजणार, विरोचकाविरुद्ध विणलेल्या जाळ्यात राजाध्यक्ष स्वतःच अडकणार, नेत्रा वाचवू शकेल का?

त्याचबरोबर या व्हिडीओखाली “मी अशी आहे तर आहे.. जाड” असं म्हटलं आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे, या व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “क्या बात ही ताई, खूपच सुंदर, खरंच खूप सुंदर दिसता तुम्ही, छान व्हिडीओ, तुम्ही जशा आहात तशा भारीच दिसता, तुम्ही जशा आहात तशाच आम्हाला आवडता” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – मेष, कर्क व मीन राशींसाठी बुधवारचा दिवस असेल शुभ, आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या…

दरम्यान, विशाखा यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोनंतर त्या नाटक व मालिकांकडेव वळल्या. सध्या त्या रंगभूमीवरील कुर्रर्रर्र नाटकात काम करत आहेत. तसेच त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह या मालिकेतूनही खलनायिकेची भूमिका साकारत  आहेत.      

Tags: marathi actressmarathi entertainment newsvishakha subhedar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Appi Amchi Collector

अखेर घटस्फोटाच्या कागदाचं सत्य आलं अप्पी व अर्जुनसमोर, वहिनीचा डाव उधळत दोघेही एकमेकांना स्वीकारणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.