अभिनेत्री हिना खान स्तनाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या स्टेजने त्रस्त आहे. अभिनेत्रीने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही माहिती दिली. सध्या तिच्यावर उपचार सुरु असल्याचेही सांगितले. तसेच लोकांना तिने या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले. आता अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जिथे हा आजार असूनही ती एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली आहे. हिना खानने या व्हिडीओबरोबर असे लिहिले आहे की, “ही अवॉर्ड नाईट आहे, मला माझ्या कॅन्सरबद्दल माहिती होती पण मी विचारपूर्वक तो मुद्दा नॉर्मल करण्याचा निर्णय घेतला. फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी. हा तो दिवस होता ज्याने सर्व काही बदलून टाकले, माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक टप्प्याची ही सुरुवात होती.(Hina Khan Emotional Video)
हिना खानने पुढे लिहिले, “तर चला काहीतरी वचन देऊ. आपण ज्यावर विश्वास ठेवतो ते नक्की घडतं. मी हे आव्हान एक संधी म्हणून स्वीकारत आहे आणि ज्याद्वारे मी स्वतःला बदलू शकेन. मी माझ्या आयुष्यात सकारात्मकता हे पहिले शस्त्र म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मी स्वतःसाठी ते सामान्य करण्याचा विचार केला आहे. माझ्यासाठी माझे काम महत्त्वाचे आहे”.
“माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी प्रेरणा, आवड व कला आहे. मी झुकणार नाही. माझ्या पहिल्या केमोपूर्वी मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकटीची प्रेरणा नव्हती, खरं तर मी प्रत्येकाला आवाहन करते की, त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी सुलभ कराव्यात. त्यानंतर तुमचे ध्येय ठरवा. आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ते कितीही अवघड असले तरी”.
या पोस्टवर दलजीत कौरने कमेंट करत असे म्हटले आहे की, “हिना, मी तुझ्या शब्दांनी प्रेरित आहे. मी ज्या गोष्टींमधून जात आहे त्या आता अचानक लहान वाटतात. तुम्ही नेहमीच प्रेरणा दिली आहे आणि यापुढेही देत रहाल. तुम्ही लवकरच बरे व्हाल आणि लवकरच अवॉर्ड शोमध्ये पुनरागमन कराल. तुम्ही असे पुरस्कारही जिंकाल”. एकता कपूरने लिहिले, “तुम्ही स्टार्समध्ये स्टार आहात. तुम्ही सर्वात जास्त चमकता”. याशिवाय मौनी रॉय, सुनीता राजवार, जुही परमार, क्षिती जोग यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हिनाच्या धाडसाचे कौतुक केले आणि तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.