सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमच्या बाबतीत हे घडलं असलं तरी…”, दोन लग्न करण्यावर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे भाष्य, म्हणाली, “चुकीचा निर्णय…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 2, 2024 | 11:43 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss OTT 3 fame Armaan Malik's wife Payal said that she does not support polygamy.

“आमच्या बाबतीत हे घडलं असलं तरी...”, दोन लग्न करण्यावर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे भाष्य, म्हणाली, “चुकीचा निर्णय...”

वादग्रस्त तरी तितकाच लोकप्रिय ‘बिग बॉस’ ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यावेळी अनेक वादग्रस्त चेहरे या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळत आहेत. युट्यूबर अरमान मालिकदेखील त्याच्या दोन्ही पत्नीबरोबर सहभागी झाला आहे. तिघांच्याही सहभागाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. सोशल मीडियावर तिघांनाही मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील करण्यात आले. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर अरमान व त्याच्या दोन्ही पत्नीनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली होती. तसेच त्यानंतर त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासेदेखील केल्याचे पाहायला मिळाले. ‘बिग बॉस ओटीटी ३’चं दुसरं एलिमिनेशन झालं आहे. यामध्ये पायल मलिक नॉमिनेट झाली आणि तिला घराबाहेर पडावं लागलं.

घराबाहेर पडल्यानंतर “मी कमी मतांमुळे बाहेर आले नसून घरातील लोकांनी मला नॉमिनेट केल्यामुळे मला बाहेर पडावं लागलं असल्याच्या भावना तिने एका व्हिडीओद्वारे व्यक्त केल्या होत्या. अशातच मीडियानेदेखील पायलशी खास बातचीत केली तेव्हाही तिने काही खुलासे केले. यावेळी तिने ‘नवभारत’शी साधलेल्या संवादात असं म्हटलं की, “माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. घरच्यांनी चूक केली आहे. मला चुकीच्या पद्धतीने उमेदवारी देण्यात आली. असे नाही की माझे कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते. माझे सर्वांशी चांगले संबंध होते, ज्यांनी मला नॉमिनेट केले त्यांनाही वाटले की, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे”.

View this post on Instagram

A post shared by Payal Malik (@payal_malik_53)

आणखी वाचा – सलमान खान गोळीबाराचे बिश्नोई कनेक्शन, मारण्यासाठी थेट पाकिस्तानातून मागवली होती शस्त्रे अन्…; नेमकं प्रकरण काय?

यापुढे तिने “सध्या माझ्या घरातील दोन लोक शोमध्ये आहेत. त्यांना पाहून मला आनंद झाला आणि दोघांनीही अंतिम लढतीपर्यंत पोहोचून ट्रॉफी आमच्या घरी आणावी अशी माझी इच्छा आहे” असं म्हटलं. यापुढे पायलने तिच्या अरमानबरोबरच्या नात्याबद्दल असं म्हटलं की, “अनेकांचे म्हणणे आहे की, पती आणि मैत्रिणीची फसवणूक आनंदाने स्वीकारुन पायल समाजाला चुकीचा संदेश देत आहे, तर आम्ही या गोष्टीचे समर्थन करत नाही. ही गोष्ट आमच्या बाबतीत घडली असली तरी कृपया असे करू नका. आम्ही बहुपत्नीत्वाचे समर्थन करत नाही”.

आणखी वाचा – त्रिनयना देवीने नेत्राच्या ओटीत दिलेल्या वस्त्राचं नेमकं रहस्य काय? देवी आई लेकींना नवीन मार्ग दाखवणार का?

दरम्यान, यूट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी पायल आणि कृतिका सर्वत्र चर्चेत आहेत. त्यांचे वादग्रस्त नाते त्यांना ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये घेऊन गेले आहे. हे तिघे शोमध्ये एकत्र पोहोचले होते, पण पहिल्याच आठवड्यात अरमानची पहिली पत्नी पायल मलिकचा या शोमधून प्रवास संपला आहे.

Tags: Bigg Boss Entertainment NewsBigg Boss OTT 3 Marathi NewsBigg Boss OTT 3 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Sushmita sen on her second life

सुश्मिता सेनला मरणाच्या दारातून परतत मिळाला नवा जन्म, नव्या जन्म तारखेविषयीही केला खुलासा, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.