साईराज केंद्रे हा लहानग्या मुलाचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला’ हा त्याचा व्हिडीओ तर प्रचंड व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर सर्वांचा आवडता असणारा साईराज सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये साईराज अमोल हे पात्र साकारत आहे. मालिकेतील त्याच्या कामाचंही प्रचंड कौतुक होत आहे. या लहान वयात तो करत असलेल्या कामाबद्दल तो अनेकांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. मालिकेत दिसणाऱ्या अमोलप्रमाणेच साईराज खऱ्या आयुष्यातही अगदी तसाच आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ या खास कार्यक्रमात नुकतीच ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अप्पी आमच्या कलेक्टर या मालिकेच्या कलाकारांबरोबर आदेश बांदेकरांनी खास संवाद साधला. यावेळी साईराजने त्याच्या खास शैलीत सर्वांची मनं जिंकली. यावेळी आदेश बांदेकरांनी साईराजला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना साईराजने केलेल्या हावभावामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आले.
यावेळी आदेश बांदेकरांनी साईराजशी साधलेल्या संवादात त्याने असं म्हटलं की, “मालिकेत माझे नाव सिंबा आहे आणि माझ्या घरचे नाव साईराज आहे. माझे आई-पप्पा मला लाडाने पिल्ल्या म्हणतात”. तसेच यापुढे त्याने तो बीडला राहत असल्याचेदेखील सांगितले. यापुढे आदेश बांदेकरांनी साईराजला त्याच्या घरी कोण कोण असतं? असं विचारलं. याचे उत्तर देत साईराजने घरी आईवडील व आजी आजोबा असल्याचे सांगितले.
आणखी वाचा – “राजकीय नेत्यांच्या भीतीतून बाहेर पडा आणि…”, शशांक केतकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “धर्म, जात यामध्ये…”
यापुढे आदेश बांदेकरांनी साईराजला “तुला कुणी शिक्षा केली आहे का?” असा प्रश्न विचारला. यावेळी साईराजने “याचं उत्तर काय देऊ तेच कळत नाही आहे” असं म्हणताच सर्वांच्या हशा पिकला. त्यानंतर साईराजने मी जेव्हा आगाऊपणा करतो तेव्हा पप्पा मला शिक्षा करतात” असं म्हटलं.
दरम्यान, सध्या साईराज ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. अप्पी व अर्जुनमध्ये आलेला दुरावा दूर करण्यासाठी अमोल प्रयत्न करत असून त्याने आईवडिलांना आता एकत्र आणले आहे. अनेकजाणं मालिकेतील अमोलच्या भूमिकेचं आणि अभिनयाचंही चाहते कौतुक करताना दिसत आहेत. प्रेक्षकांना साईराजला छोट्या पडद्यावर पाहणंही रंजक ठरत आहे.