शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“खाण्याची पद्धत, ही मुलगीही आवडत नाही”, ‘त्या’ व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना मिताली मयेकरचं उत्तर, म्हणाली, “तुमची कशातच…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 1, 2024 | 3:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mitali Mayekar gave reply to the netizen who said I don't like your eating style is not good.

"खाण्याची पद्धत, ही मुलगीही आवडत नाही", 'त्या' व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना मिताली मयेकरचं उत्तर, म्हणाली, "तुमची कशातच..."

मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियावर ही कलाकार मंडळी त्यांचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असतात. अशीच मराठी मनोरंजन सृष्टीतील सोशल मीडियावर कायम सक्रीय असणारी अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. मिताली ही सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात अहत असते. तिच्या या फोटोला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. ज्याप्रमाणे तिचे अनेक चाहते मंडळी तिच्या या फोटोंचे कौतुक करतात. तसेच काहीजण तिला तिच्या फोटोंवरुन ट्रोलही करतात आणि याच ट्रोलर्सना अभिनेत्री तिच्या खास अंदाजात उत्तरेही देते.   

मिताली तिच्या नवऱ्याबरोबर म्हणजेच सिद्धार्थबरोबर नुकतीच ट्रीपला गेली आहे. सध्या हे दोघे इटलीमध्ये मजामस्ती करत आहेत. यासंबंधीचे अनेक पोस्ट ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करत आहेत. याच इटली दौऱ्यातील काही खास फोटो व व्हिडीओ मितालीने टियाच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. पण काही नेटकऱ्यांनी तिला तिच्या खाण्यावरुन ट्रोल केलं आहे. मात्र अभिनेत्रीने तिच्या खास शैलीत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar 🌻 (@mitalimayekar)

आणखी वाचा – “राजकीय नेत्यांच्या भीतीतून बाहेर पडा आणि…”, शशांक केतकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “धर्म, जात यामध्ये…”

मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा पास्ता खातानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. इटलीमध्ये पास्ता खाताना” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने “तुझी खाण्याची पध्दत योग्य नाही” असं म्हटलं आहे. यावर मितालीने “अग्गबाई! काय करुयात मग?, एकदा तुमच्यासारखे रील बनवायचे प्रयत्न करुन बघते मॅम”

तर आणखी एकाने “मला पास्ता आणि ही मुलगी अजिबात आवडत नाही” अशी कमेंट केली आहे. नेटकऱ्याच्या या कमेंटवर मितालीने “यावरुनच दिसून येत आहे की तुमची कशातच चांगली चव नाही” असं उत्तर दिलं आहे. मितालीने दिलेल्या या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा – ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या परीक्षणासाठी संकर्षण कऱ्हाडेच्या नकाराचे कारण आले समोर, खुलासा करत म्हणाला, “मला दडपण होतं पण…”

दरम्यान, मिताली-सिद्धार्थ हे वर्षातून एकदा तरी परदेशात ट्रीप करतात आणि याचे काही खास फोटो-व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच त्यांचे या ट्रीपचे फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Tags: marathi actressmarathi entertainment newsmitali mayekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shivani surve and Ajinkya Nanaware Wedding Video

असं झालं होतं शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरेचं लग्न, चार महिने पूर्ण होताच शेअर केला Inside Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.