मराठी सिनेविश्वात अनेक कलाकार जोड्या एकामागोमाग एक लग्नबंधनात अडकत गेल्या. या जोड्यांपैकी अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे या कलाकार जोडीच्या लग्नाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. या सेलिब्रिटी जोडप्याने ३१ जानेवारीला गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. बरेच दिवसांपासून लग्नामुळे चर्चेत असणाऱ्या या जोडीने अखेर १ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. शाही थाटामाटात ही जोडी विवाहबंधनात अडकली. त्यांच्या विवाहसोहळ्याचे फोटोही तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. (Shivani surve and Ajinkya Nanaware Wedding Video)
सोशल मीडियावरही शिवानी व अजिंक्य बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच लग्नाला चार महिने पूर्ण होताच शिवानीने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये शिवानी व अजिंक्य यांच्या लग्नातील आनंदाचे क्षण पाहायला मिळत आहेत. तसेच दोघांचा लग्नातील लूकही पुन्हा पाहणं लक्षवेधी ठरत आहे.
समोर आलेल्या लग्नातील खास क्षणांच्या व्हिडीओमध्ये शिवानी व अजिंक्य यांना वाजत गाजत मंडपात आणताना दिसत आहेत. लग्नासाठी दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. वरमाला घालताना, सप्तपदी घेताना दोघे खूप खुश दिसत होते. पुण्यवचनावेळी अभिनेत्री मेघा धाडे लग्नगाठ बांधताना दिसत आहे. तर लग्नानंतर शिवानी खूप आनंदात हात वर करुन नाचताना दिसत आहे. दोघांच्या लग्नातील हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट फॉर्ममध्ये पोस्ट करण्यात आला आहे.
लग्नानंतर शिवानी ननावरेंच्या घरी रमलेली पाहायला मिळाली. लग्नानंतर त्यांच्या चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत दोघे बरेचदा फिरायला गेलेलेही दिसले. सध्या शिवानी सुर्वे ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर अजिंक्य ननावरे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. दोघेही टॉपच्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत.