आजकाल आपण पाहतो राजकारणी असो सामाजिक कार्यकर्ता असो किंवा कोणता सेलिब्रिटी याना नेहमी सुरक्षा रक्षकांचा घेरा असतो नेत्यांच्या सोबतच त्यांच्या कुटूंबियांना सुद्धा तितकीच सेक्युरिटी दिली जाते. सामान्य माणसाला या गोष्टीच कुतुहूल नसलं तरी काहीवेळा या सुरक्षेची गरज ही भासतेच. या संदर्भात अनेक किस्से ही आपल्याला पाहायला वाचायला मिळतात.(Ashok Saraf son attacked)
हे झालं आताच पण काही वर्षांपूर्वी हे इतकं सोप्प न्हवत. अनेक कलाकार, राजकारणी, खेळाडू यांची कुटुंब बाहेर देशात राहायची, काही शिक्षणासाठी, फिरण्यासाठी गेलेली असायची तेव्हा त्यांच्यावर भेटणाऱ्या प्रसंगाचं भान इथे असलेल्या त्यांच्या जवळच्या व्यक्तींना अंदाज देखील नसायचा. असाच एक किस्सा घडला होता मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत सोबत.

अशोक सराफ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दलची माहिती लिहिली आहे.आपल्याला माहिती आहे कि संपूर्ण मनोरंजन विश्व किंवा बरीच मंडळी अशोक सराफ यांना मामा या नावाने संबोधतात मामा चित्रपटांसोबतच त्यांच्या तुफान टायमिंग साठी ही ओळखले जातात. त्यांच्या टायमिंगची प्रचित आपल्याला धुमधडाका, अशी ही बनवा बनवी यांसारख्या अनेक चित्रपटांमधून येते.
हे देखील वाचा –आणि लक्ष्मीकांत निवेदिता सराफ यांना म्हणाले’बाई, एक लक्षात ठेव, तू चुकीचा सराफ शोधलास’
पॅरिस मध्ये असताना नक्की काय घडलं होतं?(Ashok Saraf son attacked)
आपला महत्वाचा मुद्दा होता मामांचा मुलगा अनिकेत यांच्या सोबत घडलेल्या प्रसंगाचा. मामांनी आठवणींना उजाळा देताना सांगितलं की अनिकेत स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पॅरिस मध्ये वास्तव्याला होता. बाहेरच्या देशात वास्तव्यासाठी किंवा शिक्षणासाठी भारतातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात जास्त जपावी ती गोष्ट म्हणजे पासपोर्ट ज्याच्या शिवाय पुन्हा मायदेशी परतणं, तिथे राहणं अवघड जातं. नेमकं अनिकेत सोबतही असच घडलं पॅरिस मध्ये शिकत असताना अनिकेतवर एक छोटा हल्ला झाला होता.

चोरीच्या उद्देशाने झालेल्या या हल्ल्यात सुदैवाने अनिकेतला कोणतीही शारीरिक इजा झाली नाही मात्र मानसिक त्रास नक्कीच झाला कारण या हल्ल्यात त्याची बॅग चोरीला गेली आणि त्यात त्याचा पासपोर्ट ही होता. असं अशोक सराफ यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की अनिकेतला नवीन पासपोर्ट आणि स्टुडंट व्हिजा साठी भारतात येणं गरजेचं होतं आणि ही सगळं ७ दिवसात होणं देखील तेवढच गरजेचं देखील होतं.

अशोक सराफ,अनिकेत यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यावेळी मामांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या आसामीची मदत घेतली त्या व्यक्तीच नाव होत राजकारणातील मंत्री छगन भुजबळ. अशोक मामांनी सांगितलं कि त्यावेळी यातून बाहेर काढण्यासाठी छगन भुजबळ यांनी मदत केली नसती तर हे शक्यच झालं नसत. आताच्या जमान्यात कलाकारांच्या फॅमिलीसोबत ही गोष्ट सहसा घडली नसती. परंतु त्याकाळात बाहेर गावी असणाऱ्या मुलांच्या काळजीने कलाकार असो व सामान्य माणूस आपल्या पाल्याची काळजी वाटणं हे साहजिक होत.(Ashok Saraf son attacked)
हे देखील वाचा –‘पहिल्याच घासाला खडा’ महेश कोठारे यांना पहिल्याच निर्मितीत आर्थिक दृष्ट्या आलं होतं अपयश