‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ‘लाडका दादुस’ म्हणून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे अरुण कदम. अरुण कदम यांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांवर वेगळीच छाप उमटवली आहे. अरुण कदम यांनी आजवर अनेक रिअॅलिटी शोजमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. आपल्या विनोदी भूमिकांनी चर्चेत असणारे हे अरुण कदम हे सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या पत्नी, लेक व नातवाबरोबरचे काही फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अरुण कदम हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नीही सोशल मीडियावर सक्रिय असतात. अशातच त्यांनी अरुण कदम यांच्या नातवाचा एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे महाराष्ट्रासह अवघ्या जगभरात अनेक चाहते आहेत. या चाहत्यांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चाहते आहेत. अरुण कदम यांचा लहान नातूदेखील या शोचा खूप मोठा चाहता आहे आणि आजोबांना टीव्हीवर बघून नातवाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अरुण कदम यांनी नातवाचा हाच खास व्हिडीओ शेअर केला आहे. अरुण कदम नेहमीच लाडक्या नातवाबरोबरचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. अशातच नातवाचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा शो बघतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आणखी वाचा – “हिंदूत्वाशी गद्दारी…”, ‘धर्मवीर-२’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, पोस्टर लॉंचला कलाकारांची हजेरी
अरुण कदम यांनीत्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे नातवाचा हास्यजत्रा बघतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये टीव्हीवर अरुण कदम यांचे स्किट चालू आहे आणि त्यांना टीव्हीवर बघून नातू आनंदाने टाळ्या वाजवत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – “तुझ्याशिवाय हा विजय…”, विराट कोहलीची पत्नीसाठी कौतुकास्पद पोस्ट, म्हणाला, “हे यश…”
अरुण कदम हे नेहमीच नातवाबरोबरचे काही खास व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि त्यांच्या या खास क्षणांना चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. आजोबा-नातवाचा हा खास बॉण्ड त्यांच्या चाहत्यांना नेहमीच भावतो. अशातच त्यांचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.