आमिर खानची लेक आयरा खानने काही महिन्यांपूर्वी नूपुर शिखरेबरोबर विवाहगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. आपल्या लग्नामुळे चर्चेत आलेला नूपुर सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. नूपुर हा लोकप्रिय फिटनेस ट्रेनर आहे. त्यामुळे अनेकदा तो सेलिब्रिटींबरोबरचे फिटनेसचे फोटो व व्हिडीओही शेअर करत असतो. त्याच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो.
नूपुर अनेकदा त्याचे मजेशीर रील व्हिडीओही पोस्ट करत असतो आणि बऱ्याचदा त्याच्या रील व्हिडीओमध्ये त्याची आई प्रीतम शिखरेदेखील असतात. या माय-लेकाचे व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘माझ्याशी नीट बोलायचं’ या ट्रेंडिंग गाण्यावरही रील व्हिडीओ केला होता. या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. यात प्रीतम यांचा निवांत व कूल अंदाज पाहायला मिळाला होता, तर दुसरीकडे नुपूर मात्र घरातली कामं करताना दिसला. नूपुर व प्रीतम या माय-लेकाची ही मस्ती चाहत्यांना विशेष आवडते.
अशातच हे दोघे माय-लेक कुठेतरी फिरायला जात असतानाचे काही खास क्षण नूपुरने शेअर केले आहेत. नूपुरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे “ट्रीपला सुरुवात झाली” असं म्हणत त्याच्या आईबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. तर दुसऱ्या स्टोरीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघे भेळ व दाबेली खात असतानाचे पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये नूपुर आपल्या आईला “आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊन भेळ आणि कच्ची दाबेली कोण खातं?” असं विचारतो. यावर नूपुरच्या आई “मी चांगली खिचडी देत होती तुला” असं म्हणते.
आणखी वाचा – Video : नणंदने काढली सोनाक्षी सिन्हाची नजर, अभिनेत्रीला कोसळलं रडू, एकमेकींना मिठी मारली अन्…
या व्हिडीओमधून नूपुर व त्याच्या आईचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. साध्या मराठी कुटुंबातली आई बाहेर जाऊनही घरातल्या जेवणाची जशी आठवण करते. अगदी तसंच नूपुरची आईही बाहेर जाताना लेकाकडे घरातल्या जेवणाची आठवण करत आहे. त्यामुळे अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे. दरम्यान, नुपूरबद्दल बोलायचं झाल्यास त्याने आमिर खानची लेक आयराशी ३ जानेवारी २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर १० जानेवारीला दोघांनी मित्र-मैत्रिणी व कुटुंबियांच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये लग्न केलं होतं.