रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नणंदेने काढली सोनाक्षी सिन्हाची नजर, अभिनेत्रीला कोसळलं रडू, एकमेकींना मिठी मारली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जून 25, 2024 | 4:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sonakshi Sinha getting emotional during the post-wedding rituals video viral on social media

Video : नणंदने काढली सोनाक्षी सिन्हाची नजर, अभिनेत्रीला कोसळलं रडू, एकमेकींना मिठी मारली अन्...

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकतेच २३ जून २०२४ रोजी झहीर इक्बालबरोबर विवाह केला. मित्र व कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचा नोंदणीकृत विवाह झाला. दोघांनी सात वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे सोनाक्षी सिन्हाला ट्रोलही केले जात आहे. या आंतरधर्मीय जोडप्याने धार्मिक विधींपेक्षा कायद्यानुसार नोंदणी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत अगदी थाटामाटात या जोडप्याचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. मुंबईत सोनाक्षीच्या घरी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार दोघांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. लग्नाची नोंदणी करताना सोनाक्षी व झहीरचे कुटुंबीय उपस्थित होते.

सोनाक्षी व झहीर यांचे लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या या व्हायरल फोटोवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सोनाक्षी भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोनाक्षीचे लग्नानंतरचे विधी पार पडत असताना ती भावुक झाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Papawan Dhankhar (@paparazzio7)

सोनाक्षी सिन्हाचा हा व्हिडिओ झहीर इक्बालची जवळची बहीण जन्नत वासीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये जन्नत तिचा भाऊ झहीर आणि भावजय सोनाक्षीची नजर काढताना दिसत आहे. भावजयचे हे प्रेम पाहून सोनाक्षी सिन्हा खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तिला तिच्या भावजयचे हे प्रेम अश्रु अनावर झाले असून ती हे अश्रु पुसतानाही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – ‘पुन्हा कर्तव्य आहे’मधील आकाशची बायको आहे हिंदी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिसते इतकी सुंदर, अभिनेत्याने सांगितली लव्हस्टोरी

सोनाक्षी सिन्हाचा लग्नात अत्यंत जबरदस्त असा लूक होता. सोनाक्षीने लग्नात अत्यंत खास अशी साडी नेसली होती. तिने ४४ वर्षांपूर्वीची साडी घातली होती आणि ती साडी तिच्या आईची आहे. विशेष म्हणजे ही साडी सोनाक्षी सिन्हाच्या आईने त्यांच्या लग्नात ती साडी नेसली होती. तर झहीर पांढऱ्या रंगाच्या चिकनकारी कुर्त्यामध्ये दिसला. दोघांचा हा लूक एकदम रॉयल दिसत होता.  

आणखी वाचा – मुस्लिम मुलाशी लग्न केल्यानंतर लेकीला धमकी व ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हांचं उत्तर, म्हणाले, “माझ्या मुलीने बेकायदेशीर असं…”

लग्नानंतर दोघांनी शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये ग्रँड रिसेप्शनही आयोजित केले होते. यामध्ये सलमान खान, काजोल, राजकुमार राव, रेखा, अदिती राव हैदरी आणि संजीदा शेख यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी सहभाग घेतला होता.

Tags: Bollywood entertainment newssonakshi SinhaSonakshi Sinha Marriage
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Aamir Khan's son-in-law Nanupur Shikhar shared a video eating bhel and dabeli with his mother at the airport.

Video : आमिर खानचा मराठमोळा जावई व त्याची आई एअरपोर्टवरच खाऊ लागले भेळ व दाबेली, जपला साधेपणा, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.