बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. २३ जून २०२४ रोजी सोनाक्षी झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२० पासून सोनाक्षी व इक्बाल एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाला घेऊन लग्नापूर्वीच अनेक चर्चांना उधाण आलं होतं. नववधूचे तिच्या कुटुंबाशी विशेषत: तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी काही मतभेद होते, असं समोर आलं होतं. पण तसं काही नसल्याचे स्वतः शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले. यानंतर ते सोनाक्षीच्या सासरच्या घरी पोहोचले, असल्याचं समोर आलं. (sonakshi sinha wedding)
२३ जून रोजी होणाऱ्या सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची सिनेविश्वात उत्सुकता आहे. समोर आलेल्या अहवालानुसार २० जून रोजी त्यांचा हळदी समारंभ पार पडला. शत्रुघ्न सिन्हा आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल खूप आनंदी व उत्साहित असल्याच पाहायला मिळालं. ते त्यांची पत्नी पूनम सिन्हाबरोबर होणाऱ्या जावयाच्या भेटीसाठी त्याच्या घरी गेले होते. झहीरच्या घराजवळ ते स्पॉट होताना दिसले.
या फोटोंमध्ये शत्रुघ्न व पूनम झहीरच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. झहीरही त्याच्या सासरच्या मंडळींना निरोप द्यायला घराबाहेर आलेला दिसला. २० जून रोजी सोनाक्षी व झहीरही त्याच्या बिल्डिंगजवळ स्पॉट होताना दिसले. यावेळी इमारतीबाहेर असलेल्या पापाराझींचे झहीरने स्वागत केले, तर सोनाक्षीने पापाराझींसमोर येणे टाळले.
आणखी वाचा – सायलीसाठी अर्जुनने धरला वटपौर्णिमेचा उपवास, बायकोच्या हातूनच उपवास सोडला अन्…
सोनाक्षी सिन्हाचा भाऊ लव सिन्हा याने आपल्या बहिणीच्या लग्नावर अद्याप काहीही भाष्य केलेलं नाही. त्याने ट्विटरवर माध्यमांना संबोधित करणारी एक पोस्टही शेअर केली होती. यांत त्याने लिहिले होते की, “मीडियाच्या प्रिय मित्रांनो. मी गुप्त संदेश पोस्ट करत नाही. जेव्हा मला काही सांगायचे असेल तेव्हा मी ते स्पष्टपणे सांगेन”. दरम्यान, सोनाक्षी व झहीरने २०२२ मध्ये आलेल्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते.