महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रसिद्ध विनोदी कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील स्किट सुद्धा तेवढेच इंटरेस्टिंग असतात. हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकार त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसतात. या कार्यक्रमातील सगळ्याचं कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. असाच हास्यजत्रा या कार्यक्रमातील विनोदी अभिनेता गौरव मोरे, काहीदिवसांपूर्वी एका वेगळ्या लूकमध्ये हास्यजत्रेत दिसत होता. या लूकमधील फोटो गौरवने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (Gaurav More New Look)
या फोटोमध्ये गौरव मोठ्या केसांसोबतच त्याने दाढी सुद्धा वाढवल्याचं दिसतंय. गौरव च्या नवीन लूकची सगळ्यांनी तारीफ देखील केली आहे. परंतु गौरवाचा हा नवीन लुक करण्यामागचं कारण काय हे अद्याप गौरवने स्पष्ट केलं नाहीये. कदाचित गौरव एखाद्या नवीन सिनेमामध्ये किंवा एखाद्या नवीन प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळेल का? असा अंदाज आपण लावू शकतो.

हे देखील वाचा: ऐश्वर्या नारकर ठरतायत चाहत्यांसोबतच कलाकारांसाठी सुद्धा प्रेरणा’या’ अभिनेत्रीची कमेंट ठरते लक्षवेधी
गौरव राहणारा पवई फिल्टर पाड्याचा असल्यामुळे गौरव मोरेला सगळे फिल्टर पडायचा बच्चन म्हणून ओळखतात. गौरव कालेज मध्ये असताना त्याने एकांकीमध्ये सहभाग घेतला आणि पुढे त्याने एकपात्री नाटके केली. त्यानंतर नाटक करत असताना त्याची ओळख त्याचा सहकलाकार आणि लेखक तथा अभिनेता प्रसाद खांडेकर शी झाली. त्यानंतर त्याने त्याच्यासोबत नाटकात काम केले. पुढे गौरवने माझिया प्रियेला प्रीत कळेना या मालिकेतील छोट्या पडद्यावर पदार्पण केले. (Gaurav More New Look)
हे देखील वाचा: ‘आणि जेव्हा चाहते कलाकाराला लिफ्ट देतात’ कोल्हापूरकरांचा फॅन झाला अभिनेता उत्कर्ष शिंदे
गौरव ला खरी ओळख हास्यजत्रा या कार्यक्रमातून मिळाली. या कार्यक्रमातून त्याने वेगवेळे स्किट करून प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलच परंतु त्याने प्रेक्षकांची माने देखील जिंकली. गौरवला आता समंध महाराष्ट्र ओळखतो. गौरवने घेतलेलें कष्ट आणि मेहनीतीचे फळ त्याला मिळाले.