‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. मोजक्या तरी लोकप्रिय भूमिका करत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. बिग बॉस मराठी नंतर अभिनेत्री आणखीनच प्रसिद्धी झोतात आली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या रुचिराच्या सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत. आपल्या सौंदर्य व अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. रुचिरा तिचे अनेक स्टायलिश व ग्लॅमरस् फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच कालच्या ईदनिमित्त शेअर केलेल्या फोटोमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.
कालच्या बकरी ईदनिमित्त रुचिराने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मात्र या फोटोमुळे अभिनेत्री ट्रोलर्सच्या कचाट्यात सापडली आहे. “माझ्या इंटरनॅशनल ट्रॅव्हल शोसाठी बहरीनमध्ये शूटिंग करताना खूप आनंद झाला” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. मी येथे सुंदर बहरीनची झलक शेअर करत असल्याचे तिने सांगितले. बहरीन टूर माझ्या हृदयात कोरली गेली आहे. यातील ही शेवटची पोस्ट मी शेअर करत असल्याचेही ती म्हणाली. तसेच “या पोषाखामुळे मला मुन्नी असल्याचे वाटत आहे. मुंज्यावाली मुन्नी नव्हे, बदनाम झालेली मुन्नी नव्हे तर जय श्रीराम वाली मुन्नी” असेही तिने पुढे म्हटले.
रुचिराने तिचे हे फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काही अवधीतच तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. तिच्या या फोटोखाली एका ट्रोलरने “इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये धर्मो रक्षति रक्षित: लिहायचं आणि इकडे ईदच्या शुभेच्छा द्यायच्या, किती तो विरोधाभास?” असं म्हटलं आहे तर आणखी एकाने “धर्मो रक्षति रक्षित: फक्त बायोमध्ये लिहिण्यासाठी नाही तर त्याचे पालनही केलं पाहिजे” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर आणखी एकाने “इतके मराठी सण आहेत मग ईद मुबारक वगैरे कशाला?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच एकाने “दसरा दिवाळी गुढीपाडवा या सणांच्या दिवशी कोणती मुस्लिम महिला साडी घालून, कुंकू लावून तुम्हाला शुभेच्छा देते का? मग तुम्हाला एवढा पुळका का?” अशी कमेंट केली आहे. या कमेंट्ससह आणखी बऱ्याच कमेंट्स करत नेटकऱ्यांनी रुचिराला ट्रोल केले आहे. त्याचबरोबर तातडीने अनफॉलो करणार असल्याचेही म्हटले आहे.

आणखी वाचा – निर्जला एकादशीमुळे मंगळवारचा दिवस आहे खूपच, तुमच्या सर्व इच्छा व मनोकामना होतील पूर्ण, जाणून घ्या…
दरम्यान, या पोस्टखाली अनेक नकारात्मकत कमेंट्स येताच अभिनेत्रीनेही तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “कमेंट्समध्ये लोकांची नकारात्मकता पाहून मला धक्काच बसला आहे. पण ठीक आहे. मी या फोटोमध्ये कुर्तीव त्यावर डेंनीम असा पोशाख परिधान केला आहे, जो की माझ्या कामाचाच एक भाग आहे. ‘कर्म’ आणि ‘धर्म’ पूर्णपणे समजणाऱ्यांसाठी ही पोस्ट. बाकी तुम्हा सर्वांना काय बोलावे हे मला माहीत नाही”.
तसेच यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “महाराजांचा उल्लेख करणाऱ्यांना विचारायचं आहे की, त्यांनी कधी दुसऱ्या धर्माचा निरादर करायला शिकवलं आहे का?. माझ्या बायोमधील ‘धर्मो रक्षति रक्षित:’ यावरून प्रश्न विचारणा ऱ्यांना गीतेतला हा श्लोक कळला असता तर तुमची प्रतिक्रिया वेगळी असती. तुमच्या भावनांचा आदर आहेच पण याचा अर्थ तुमचे विचार नेहमीच योग्य असतात असं नाही”