‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागाच्या शेवटी विरोचक व नेत्रा या दोघांना वीणेचा आवाज ऐकू आला होता. अशातच रुपाली झोपलेली असताना तिला तिच्या खोलीत वीणा दिसते. ती उठून वीणा वाजवणार इतक्यात तिच्या लक्षात येते की, मागे एकदा नेत्राने वीणेची तार मोडली होती आणि आता मी वीणा वाजवली तर ती येऊन पुन्हा काहीतरी करेल. म्हणून ती नेत्रा व इंद्राणी यांच्यापासून लांब जाऊन वीणा वाजवण्याचा विचार करते.
यानंतर शेखर नेत्रा, अद्वैत व इंद्राणी यांना रुपालीच्या वीणाबद्दल सांगतो. तेव्हा इंद्राणी विरोचकाला वीणामुळे पुन्हा कुठली तरी शक्ती मिळणार असल्याबद्दल सांगते. तेव्हा नेत्रा आपल्याला आता सावध राहिले पाहिजे असं म्हणते. मात्र इंद्राणी नेत्राला विरोचकापासून लांब राहण्याचा सल्ला देते. तसेच नेत्रा यावेळी विरोचक पुन्हा शक्ती मिळवण्यात यशस्वी होईल असं सर्वांना सांगते.
यादरम्यान केतकी काकू व फाल्गुनी नेत्राला उष्ण पदार्थ खाऊ न देण्याविषयी बोलत असताना तिथे रुपाली येते व ती याबद्दल विचारणा करते. तेवढ्यात केतकी काकू चालाखीने नेत्राला ऍसिडिटीचा त्रास होत असल्याने तिला उष्ण पदार्थ खायचे नसल्याचे रुपालीला सांगते. याचदरम्यान रुपालीला पुन्हा एकदा वीणेचा आवाज ऐकू येतो. तेव्हा रुपाली कानावर हात ठेवते. मात्र रुपाली हे असं का करतेय याबद्दल फाल्गुनी व केतकी काकू यांना काहीच कळत नाही. त्यामुळे रुपाली त्यांना माझा कान ठणकत असल्याचे खोटे खोटे सांगते. या वीणाचा आवाज ऐकू आल्यामुळे रुपालीला मात्र आता कुठली तरी नवीन शक्ती मिळणार असल्याचे माहीत झाले आहे.
यानंतर केतकी काकू व फाल्गुनी घडलेल्या प्रकाराबद्दल नेत्रा, इंद्राणी, शेखर व अद्वैत यांना सांगतात. त्यामुळे आता विरोचकाला या नवीन शक्ती मिळण्यापासून रोखले पाहिजे असा निर्णय नेत्रा व इंद्राणी घेतात. अशातच रुपाली त्या वीणेच्या आवाजाच्या शोधात घराच्या बाहेर निघाली आहे आणि ती वीणा असलेल्या ठिकाणी पोहोचून वीणा वाजवू लागते.
आणखी वाचा – शिवयोगामुळे सोमवारचा दिवस फायद्याचा, सिंह, तूळ व कुंभ राशीच्या लोकांना मिळणार खुशखबर, जाणून घ्या…
वीणाची तार तुटलेली असतानादेखील रुपाली वीणा वाजवते. तिच्या वीणा वाजवण्यामुळे मात्र नेत्रा, अद्वैत व इंद्राणी यांना इकडे धक्के बसत आहेत. त्यांच्या पायाखालची जमीनीला हादरे बसत आहेत. त्यानंतर अचानक वीणाचा आवाज ऐकू येणे बंद होते. रुपाली वीणा वाजवत असतानादेखील त्यातून आवाज येत नसल्यामुळे विरोचक पुन्हा चिंतेत पडतो.
आणखी वाचा – Video : प्राजक्ता माळीच्या वडिलांची आजारपणात झालेली अशी अवस्था, चालताही येत नव्हते, शेअर केला भावुक व्हिडीओ
त्यामुळे आता पुढील भागात विरोचकाला नक्की कोणती शक्ती मिळाली आहे? त्यामुळे नेत्रासह तिच्या बाळाला व राजाध्यक्ष कुटुंबियांना नेमका काय धोका असणार. तसेच आता नेत्रा व इंद्राणी विरोचकाचा लढा कसा देणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.