बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अधिपती-अक्षरालाही ‘अंगारो सा…’ गाण्याची भुरळ, हुकस्टेपने वेधलं लक्ष, भुवनेश्वरीही कमेंट करत म्हणाली…   

Saurabh Moreby Saurabh More
जून 19, 2024 | 4:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
'Tula Shikvin Changalch Dhada' fame adhipati akshara aka Hrishikesh Shelar and Shivani Rangole shared dance video on the song Angaaron Sa from Pushpa 2

Video : अधिपती-अक्षरालाही ‘अंगारो सा...’ गाण्याची भुरळ, हुकस्टेपने वेधलं लक्ष, भुवनेश्वरीही कमेंट करत म्हणाली...   

सोशल मीडियावर सध्या ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारो सा…’ हे गाणं ट्रेंड करत आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाची गाणीसुद्धा सर्वत्र व्हायरल झाली होती. अशातच आता ‘पुष्पा’ चित्रपटाचा भाग दोनही येत्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुष्पा व श्रीवल्लीची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या चित्रपटाआधीच यातील गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अगदी सामान्य माणसांपासून मोठमोठे सेलिब्रिटी सध्या या ‘अंगारो सा…’ या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी या गाण्यावर डान्स व्हिडीओ करत प्रेक्षकांना भूतल घातली आहे. ऐश्वर्या व अविनाश नारकर, स्पृहा जोशी, पूर्वा  शिंदे, शरयू सोनावणे, ईशा केसकर, यांसह अनेक कलाकारांनी या गाण्यावर रील व्हिडीओ शेअर केला आहे. या लोकप्रिय कलाकारांमध्ये आता आणखी एका सुपरहिट जोडीची भर पडली आहे आणि ही लोकप्रिय जोडी म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अधिपती व अक्षरा म्हणजेच अभिनेता हृषीकेश शेलार व अभिनेत्री शिवानी रांगोळे.

View this post on Instagram

A post shared by Shivani Rangole Kulkarni (@rangshivani)

आणखी वाचा – Video : प्राजक्ता माळीच्या वडिलांची आजारपणात झालेली अशी अवस्था, चालताही येत नव्हते, शेअर केला भावुक व्हिडीओ

हृषीकेश व शिवानी या दोघांनी सारख्या रंगाचे कपडे परिधान करत ‘अंगारो सा…’ या ट्रेंडिंग गाण्यावरचा डान्स करतानाचा रील व्हिडीओ शेअर केला आहे. रश्मिका व अल्लू अर्जुन यांच्या खास हुकस्टेप्स करत त्यांनी या गाण्यावर छान ठेका धरला आहे. “खूप साऱ्या नियोजनानंतर आम्ही हा डान्स करु शकलो” असं म्हणत  त्यांनी हा खास व्हिडीओ आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. या व्हिडीओलं अनेक चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – विरोचकाच्या हाती पुन्हा एकदा विचित्र वीणा, नवीन शक्ती मिळणार? काय असेल नेत्राचं पुढचं पाऊल?

दरम्यान, अधिपती व अक्षरा यांच्या जोडीबद्दल सांगायचं झालं तर मालिकेत सध्या त्यांच्यातील प्रेमाचे कथानक सुरु असून हे कथानक  चाहत्यांना विशेष आवडत आहे. नुकतेच अक्षराने  खास अंदाजात अधिपतीला प्रपोज केले असून् आता त्यांच्यातील प्रेम आणखी फुलत आहे. ज्याप्रमाणे प्रेक्षक कथानकाच्या व अधिपती-अक्षरा यांच्या प्रेमात पडत आहेत. तसेच त्यांच्या या डान्सच्याही सर्वच प्रेमात पडले आहेत.           

Tags: Angaaron Sa Dancehrishikesh shelarmarathi entertainment newsshivani rangole
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Paaru Serial Update

पारूचं मन आदित्यमध्ये गुंततंय, एकमेकांसह फिरायलाही गेले, अखेर देणार का प्रेमाची कबुली?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.