बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : प्राजक्ता माळीच्या वडिलांची आजारपणात झालेली अशी अवस्था, चालताही येत नव्हते, शेअर केला भावुक व्हिडीओ

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 16, 2024 | 8:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prajakta Mali shared Father's Day special video but actress's father is not well.

Video : प्राजक्ता माळीच्या वडिलांची आजारपणात झालेली अशी अवस्था, चालताही येत नव्हते, शेअर केला भावुक व्हिडीओ

मराठी मनोरंजन विश्वातील काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. छोट्या पडद्यावरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेद्वारे तिने जोडलेली रेशीमगाठ अजूनही कायम आहे. प्राजक्ताने मराठी मालिका, चित्रपट यांसह अनेक कार्यक्रमांद्वारे सूत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनय व उत्तम सूत्रसंचालनाद्वारे चर्चेत असणारी अहिनेत्री तिच्या सोशल मीडियाद्वारे ही तितकीच चर्चेत असते.

सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावरील तिच्या अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच प्राजक्ताने आजच्या ‘फादर्स डे’निमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ वडिलांचा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या वडिलांची तब्येत खालावलेली पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताने त्यांचा एक व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “माझे वडील त्यांच्या गेल्या वर्षीच्या वाढदिवशी खूप अस्वस्थ होते, त्यांना चालताही येत नव्हते; तरीही ते मोठ्याने ‘मैं हुँ डॉन’ हे गणं गात होते. मला जगातले सगळ्यात गोड, गोंडस वडील मिळाले आहेत. गेल्या १० वर्षांहून अधिक काळ मी मुंबईत राहत आहे आणि ते अजूनही मला दिवसातून किमान दोनदा फोन करतात आणि फक्त ‘जेवलीस का?’ विचारतात”.

आणखी वाचा – मालिकेत अडाणी पण खऱ्या आयुष्यात उच्चशिक्षित, ‘तुला शिकवीन…’मधील अधिपतीचे शिक्षण किती? अभिनेत्यानेच दिली माहिती

यापुढे तिने “मी स्वत:ला याबद्दल भाग्यवान समजते आणि ज्यांच्याकडे वडील आहेत ते सुद्धा. आमचे पालक आमचे देवदूत आहेत; परम विवेकाने पाठवलेले.” असं म्हणत “सर्वांना ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा” असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – शिवयोगामुळे सोमवारचा दिवस फायद्याचा, सिंह, तूळ व कुंभ राशीच्या लोकांना मिळणार खुशखबर, जाणून घ्या…

दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये प्राजक्ताचे सर्व कुटुंबीय ‘मैं हुँ डॉन’ गाण्यावर नाचत आहेत. त्याचबरोबर प्राजक्ताच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एन्जॉयही करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी अभिनेत्रीला ‘फादर्स डे’निमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.

Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update Virochak got vichitra veena that’s why he got new power

विरोचकाच्या हाती पुन्हा एकदा विचित्र वीणा, नवीन शक्ती मिळणार? काय असेल नेत्राचं पुढचं पाऊल?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.