‘झी मराठी’ वाहिनीवर साधारण दीड वर्षांपूर्वी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्याचे ४०० भाग पूर्ण केले. दमदार स्टारकास्ट आणि रंजक कथानकाच्या जोरावर या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी आपलंसं करून घेतलं आहे. मालिकेतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका भागात अक्षराने अधिपतीला आपल्या प्रेमाची कबुली दिली. अक्षराने अधिपतीसारख्या रांगड्या स्टाइलने तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे सांगितलं. बायकोने प्रेमाची जाहीर कबुली दिल्यावर अधिपतीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसत आहे. अक्षरा व अधिपती यांच्या खऱ्या संसाराला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रेक्षक अधिकच मालिकेच्या प्रेमात पडत आहेत.
अक्षरा-अधिपतीचं नातं घट्ट होत असतानाच भुवनेश्वरीला त्यांच्या नात्याबद्दल माहिती झाली आहे. त्यांच्यातील वाढती जवळीक पाहून भुवनेश्वरीला आपला मुलगा हातातून जात आहे की काय? अशी भीती वाटत आहे. याबद्दलचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये ती अधिपती व अक्षराविरुद्ध कट रचताना दिसत आहे. अक्षरा आणि अधिपतीचा खरा संसार आता कुठे सुरु झाला आहे. त्यांच्या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी आजी ठरवते की, त्यांच्यासाठी काहीतरी खास करायचं. अधिपती-अक्षराची खोली सजवण्याची तयारी आजी सुरु करते आणि ही गोष्ट भुवनेश्वरीला समजताच तिचा संताप होतो.
आणखी वाचा – ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’चं असं होतं शूट, टीव्हीवर दिसणार बंगला आतून दिसतो असा, Inside Video समोर
त्यामुळे भुवनेश्वरी अधरा-अधिपतीला वेगळं करण्याचा नवा कट रचण्याच्या तयारीत आहे. भुवनेश्वरी मुद्दाम दुर्गेश्वरीला त्यांची खोली जातीने लक्ष घालून सजवण्याचा आदेश देते. आता यात भुवनेश्वरीचा नवीन प्लॅन नक्की काय आहे? अक्षरा अधिपतीमध्ये यामुळे एका नव्या नात्याची सुरुवात होणार? की पुन्हा एकदा भुवनेश्वरीला या दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्यात यश येणार? हे कागामी भागात पाहायला मिळणार आहे.