‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्यला बरं नसतं त्यामुळे आदित्य ऑफिसला जाणार नाही याची जबाबदारी अहिल्यादेवी सावित्रीला देतात. तर त्यानंतर अहिल्यादेवी विचार करत असतात की, आदित्यवर एवढी मोठी संकट येत आहेत आणि त्याचं संकटरक्षक कोण असेल याचा विचार त्या करत असतात तेव्हा श्रीकांत तिथे येतो आणि पारूचं नाव सुचवतो आणि सांगतो की, याआधीही पारूने आपल्याला बरेचदा वाचवलं आहे, संकेतावर तुझा विश्वास आहे म्हणून मी तुला हे सांगत आहे की, पारू हा आपल्याला पाठवलेला एक संकेतच असू शकतो. (Paaru Serial Update)
यावर अहिल्यादेवी ही विश्वास ठेवतात त्यानंतर अहिल्यादेवी श्रीकांतला सांगतात की, आपण देवतेच्या दर्शनाला जाऊन येऊ, यावर आदित्यला कसं नेणार हा विषय असतो मात्र श्रीकांत सांगतो की, आपण दोघंच जाऊन येऊ, आपलं पुण्य हे आपल्या मुलांना लागेलच. त्यानंतर इकडे आदित्य डोळ्यांच्या प्रेमात बुडालेला असतो तेव्हा प्रीतम येऊन त्याची चेष्टा करतो तितक्यात अहिल्यादेवी येतात आणि दोघांना सांगतात की, आदित्य तू पूर्णपणे बरं होईपर्यंत घरातच राहायचं आहे आणि अजिबात काम करायचं नाही.
मी आणि श्रीकांत कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन येतो, असं सांगून त्या तिथून निघून जातात. त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी पारूच्या लग्नासाठी गणेश पूजेची तयारी सुरु असते. गणेश पूजा अगदी उत्तम पार पडते, त्यानंतर अहिल्यादेवी मारुतीला सांगतात की, आज तुला जे काही मागायचेआहे ते माग, मी तुला देईन. यावर मारुती काहीच बोलत नाही. दिशा व दामिनीने मारुतीला किर्लोस्कर यांच्या पैशांवरुन खूप काही सुनावलेलं असतं, ते मारुतीच्या मनाला लागलेलं असतं म्हणून मारुती अहिल्यादेवींना सांगतो की, माझ्या ऐपती प्रमाणे मला माझ्या मुलीचे लग्न करायचा आहे. तेवढी परवानगी तुम्ही मला द्या. हे ऐकल्यावर अहिल्यादेवींना संशय येतो की, मारुतीला कोणीतरी काहीतरी बोलला आहे. मात्र मारुती कोणीच काही बोललं नसल्याचे सांगतो आणि माझ्या बायकोची इच्छा असल्याचं सांगतो. त्यावर अहिल्यादेवी ही जास्त काही न म्हणता परवानगी देतात आणि काही लागलं तर मदतीसाठी हाक द्यायला सांगतात. आणि त्याच वेळेला अहिल्यादेवी निघताना पारुला सांगतात की, आदित्यची जबाबदारी तुझी आहे आम्ही जाऊन येईपर्यंत आदित्यला तू सांभाळशील ना?, यावर पारू देखील हो असं उत्तर देते. तर दामिनी-दिशा या लक्ष ठेवूनच असतात.
आदित्य सावित्रीने बनवलेला कोणताच नाष्टा करायला तयार नसतो कारण त्याला खोली बाहेर पडायचं असतं. त्यावेळेला सावित्री पारूला येऊन हे सगळं काही सांगते. त्यानंतर पारू काढा घेऊन आदित्यच्या खोलीत जाते आणि सांगते की, तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं असेल तर हा काढा घ्यावाच लागेल आणि ही इच्छा आदित्यजवळ व्यक्त करते. त्यानंतर आदित्य सुद्धा म्हणतो की, माझी सुद्धा एक इच्छा आहे ती तू पूर्ण करशील का?, आता आदित्य पारूजवळ कोणती इच्छा मागणार हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.