शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षरा-अधिपतीमध्ये रोमान्स, बायकोसाठी खास कविताही केली तयार, दोघांमध्ये वाढती जवळीक पाहून भूवनेश्वरी मोठा डाव खेळणार

Saurabh Moreby Saurabh More
जून 13, 2024 | 2:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial update love between Adhipati and Akshara is blossoming

अक्षरा-अधिपतीमध्ये रोमान्स, बायकोसाठी खास कविताही केली तयार, दोघांमध्ये वाढती जवळीक पाहून भूवनेश्वरी मोठा डाव खेळणार

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेम बहरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत एकामागून एक रंजक वळण घेत असून अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेमाचा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकतीच अक्षराने अधीपतीला तिच्या प्रेमाची कबुलीदेखील दिली आहे. प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसत आहे. अक्षरा व अधिपती यांच्या खऱ्या संसाराला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रेक्षक अधिकच मालिकेच्या प्रेमात पडत आहेत.

अक्षराने अधिपतीच्या खास अंदाजात त्याला आपल्या प्रेमाची मागणी घातली. या नवीन ट्विस्टला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. अशातच आता अधिपती-अक्षरा यांच्या फुलणाऱ्या प्रेमाचे चित्रण करणारे काही खास व्हिडीओ झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात येत आहेत. या नवीन व्हिडीओमधून अधिपती-अक्षरा यांच्यातील गोड क्षण पाहायला मिळत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : कोकणातल्या गावी गेल्यानंतर पूजा सावंतला सेलिब्रिटी असल्याचाही पडला विसर, राहत आहे इतकी साधी, व्हिडीओमध्ये दिसलं घर

या मालिकेचा नुकताच शेअर करण्यात व्हिडीओ सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे, या नवीन प्रोमोमध्ये अधिपती अक्षरासाठी एक खास कविता करत आहे. घरातील लाइट गेली असताना अधिपती व अक्षरा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असताना अधिपती अक्षरासाठी खास कविता करतो. यावेळी तो अक्षरासाठी कविता करत असं म्हणत की, “कवितेची नवी ओळ तुमच्यामुळे सुचली, चाफ्याच्या गंधात सगळी दु:ख हसली, थोडं तुमचं थोडं आमचं वाटून घेऊ आधं आधं, मिठीतला वणवा म्हणतो गोड गोड गार गर फुलातला मध”

आणखी वाचा – लीलाच्या घरी पोहोचला एजे, दोघांना एकत्र आणण्यासाठी आईनेच रचला डाव, बायको म्हणून स्वीकार करणार का?

या नवीन प्रोमोबरोबर अधिपती व अक्षरा यांचे आणखी काही रोमॅंटिक प्रोमो शेअर करण्यात आले असून हे खास प्रोमो चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. मालिकेचा हा नवीन व्हिडीओ प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत असून या नवीन ट्विस्टही त्यांना आवडत आहे. दरम्यान, अधिपती व अक्षरा यांच्यातील प्रेमात आता भुवनेश्वरी मिठाचा खडा टाकणार का?, त्यांच्यातील प्रेमात भुवनेश्वरी व्यत्यय आणणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.       

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Ketaki Chitale slams Maharashtra Government

"आता तुम्हाला हिंदूही नकोत का?", सरकारच्या 'त्या' निर्णयावर केतकी चितळे भडकली, कॅमेरासमोरच रडू लागली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.