मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कोकणातल्या गावी गेल्यानंतर पूजा सावंतला सेलिब्रिटी असल्याचाही पडला विसर, राहत आहे इतकी साधी, व्हिडीओमध्ये दिसलं घर

Saurabh Moreby Saurabh More
जून 13, 2024 | 12:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pooja Sawant home in Konkan.

Video : कोकणातल्या गावी गेल्यानंतर पूजा सावंतला सेलिब्रिटी असल्याचाही पडला विसर, राहत आहे इतकी साधी, व्हिडीओमध्ये दिसलं घर

‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत मराठीसह हिंदी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाने व सौंदर्याने मोहिनी घालणारी ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. मराठी मनोरंजन सृष्टीतली ही लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकली. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली असून आज पूजा नुकतीच भारतात परतली आहे आणि तिच्या माहेरी आली आहे.

आपल्या अनोख्या भूमिकांनी चर्चेत राहणारी पूजाही सोशल मीडियावरदेखील तितकीच चर्चेत राहत असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने नुकतेच तिच्या गावचे काही खास फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. अभिनेत्री तिच्या कोकणातल्या गावी गेली असून गावच्या घराचे, आजूबाजूच्या परिसराचे फोटो व व्हिडीओ तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. पूजा आई-बाबा, भाऊ-बहिणीसह कोकणात गेली आहे. याबद्दल काल तिने विमानाने प्रवास करतानाचा फोटोही शेअर केला होता.

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

आणखी वाचा – “असला घाणेरडा परिसर आणि…”, गोरेगाव फिल्मसिटी बाहेरील कचऱ्याचा ढिग पाहून भडकला शशांक केतकर, म्हणाला, “मोदीजी असो वा राहुलजी…”

अशातच पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये पूजा तिच्या कोकणातल्या गावच्या झाडांना पाणी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. “कोकणातील सकाळ” असं म्हणत पूजाने हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच “पावसाच्या आगमनापुर्वी आमच्या घरी नवीन ६ माडांचं आगमन झालं” असंही म्हटलं आहे. ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ हे खास गाणं लावत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.    

आणखी वाचा – लग्नानंतर फिरायला गेल्यावर मुग्धा-प्रथमेश यांचे देवदर्शन, महादेवाच्या मंदिरातही गेले, फोटो व्हायरल

दरम्यान, पूजाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्येतिच्या गावच्या घराची झलकही दिसत आहे. नवीन घर बांधत असल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला पूजाच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत उत्तम प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओमधून पूजा कुटुंबियांसह कोकणात एन्जॉय करतानाचे पाहायला मिळत आहे. “कोकण म्हणजे स्वर्ग”, “कोकणात तुमचं गांव कुठे आहे?”, “तुमचे हास्य खूपच सुंदर आहे” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.  

Tags: marathi entertainment newspooja sawantPooja Sawant Kokan Home Photos and Videos
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
karan oberoi statement

दीड महिना टॉयलेट साफ केलं, मृत्यूने गाठलं अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्याची जेलमध्ये झालेली अशी अवस्था, म्हणाला, "कदाचित मी मरणार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.