शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लीलाच्या घरी पोहोचला एजे, दोघांना एकत्र आणण्यासाठी आईनेच रचला डाव, बायको म्हणून स्वीकार करणार का?

Saurabh Moreby Saurabh More
जून 13, 2024 | 1:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla marathi serial update

लीलाच्या घरी पोहोचला एजे, दोघांना एकत्र आणण्यासाठी आईनेच रचला डाव, बायको म्हणून स्वीकार करणार का?

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकताच मालिकेत एजे व लीला यांच्या लग्नाचा ट्विस्ट पाहायला मिळाला. श्वेताऐवजी एजेचे लग्न हे लीलाबरोबर झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. मालिकेतील हा ट्विस्ट मालिकेच्या चाहत्यांना आवडला असला तरी एजेच्या सूनांना ही गोष्ट काही पटलेली नाही. एजेलादेखील श्वेताऐवजी त्याचे लीलाबरोबर लग्न झालेले पटलेले नाही. याबद्दल एजेने लीलावर राग व्यक्त  केला होता. तसेच लीलाने एजेचा विश्वासघात केल्याचेही त्याने म्हटले होते.

यानंतर लीलाने जहागीरदारांच्या घरात  सून  म्हणून प्रवेश केला. मात्र ही गोष्ट एजेंच्या सूनांना पटली नाही. त्यानंतर एजेंची आई सरोजिनी जहागीरदार लीलाबरोबर घराबाहेर पडल्या. घरातल्या कुणालाच काहीच न सांगता त्या लीलाबरोबर घराबाहेर पडल्या. त्यामुळे सर्वजण चिंतेत पडले असून एजे आईला फोन करतात. तेव्हा एजेंच्या आई असं म्हणतात की, “अभिराम जशा तूला तुझ्या सूना महत्त्वाच्या आहेत. तशी माझी सूनही माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मी आता घरी येईन तर माझ्या सूनेला सोबत घेऊनच येईन”. कथानकातील हा नवीन ट्विस्ट सध्या प्रेक्षकांना चांगलाच आवडला.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “असला घाणेरडा परिसर आणि…”, गोरेगाव फिल्मसिटी बाहेरील कचऱ्याचा ढिग पाहून भडकला शशांक केतकर, म्हणाला, “मोदीजी असो वा राहुलजी…”

अशातच या कथानकात आणखी एका नवीन ट्विस्टची भर पडली असून या नवीन ट्विस्टबद्दलचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा नवीन प्रोमो कथानकातील पुढील ट्विस्ट निर्माण करत आहे. या नवीन प्रोमोमध्ये एजे आपल्या आईला घेऊन जाण्यासाठी आले असून त्यांची आई त्यांना व लीला मानाने घेऊन् जाण्याचे सांगतात. यापुढे ते लीलाला तुझ्यासारख्या फसव्या मुलीला मी माझ्याबरोबर कधीच घेऊन् गेलो नसतो पण आईसाठी मला हे करावं लागत असल्याचे तो म्हणतो.

आणखी वाचा – Video : कोकणातल्या गावी गेल्यानंतर पूजा सावंतला सेलिब्रिटी असल्याचाही पडला विसर, राहत आहे इतकी साधी, व्हिडीओमध्ये दिसलं घर

एजे लग्नानंतर पहिल्यांदाच लीलाच्या घरी आल्याने तिचे वडील एजेला काही रितीभाती पूर्ण करण्याबद्दल सांगतात. पुढे लीलाची एजेंना कंकण सोडवण्याच्या विधी करण्याविषयीही सुचवते. त्यामुळे आता एजे लीलाबरोबरच्या कंकण विधीसाठी तयार होणार का? तसेच लीला पुन्हा एजेंबरोबर जहागीरदारांच्या घरात जाणार का? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.        

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsNavri Mile Hitlerla
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Vaibhav Mangale With His Children

Video : वैभव मांगलेंच्या लेकाला इंग्रजी शब्द उच्चारताही येईना, स्वतःच शेअर केला व्हिडीओ, वाचन ऐकून तुम्हीही म्हणाल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.