बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटसृष्टीमध्ये कोणाचाही पाठिंबा नसताना तिने आपले एक वेगळे अस्तित्त्व निर्माण केले आहे. सध्या अभिनेत्रीने आपला मोर्चा अभिनयाकडून राजकारणाकडे वळवला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ती हिमाचल प्रदेशमधील मंडी या विभागातून निवडून आली. ती निवडून आल्यानंतर सर्वत्र जल्लोषही केला गेला तर अनेकांना आश्चर्यदेखील वाटले. त्यानंतर ती चंदीगढ एअरपोर्टवरुन दिल्लीला येण्यासाठी निघाली असता एअरपोर्टवरच एका CISF कॉन्स्टेबलने तिच्या कानशिलात लागावली. (karan johar on kangana ranaut)
दरम्यान चंदीगढ एअरपोर्टवरील प्रकरण हे प्रकरण खूपच वाढले. सर्व स्तरातून विविध प्रतिक्रियादेखील उमटल्या. अनेकजण कंगनाच्या बाजूने तर अनेक जण कॉन्स्टेबलच्या बाजूने उभे राहिले. गायक व संगीतकार विशाल ददलानीने महिला कॉन्स्टेबलला नोकरी देण्याचे आश्वासनही दिले. आशातच आता निर्माता करण जोहरनेही या प्रकरणावर भाष्य केले आहे.
कंगना व करण यांच्यामधील मतभेद हे जगजाहीर आहेत. कंगनाने याआधीच करणवर नेपोटीजमचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांमध्ये नेहमीच वाद होताना दिसून आले. आता करणने पुन्हा एकदा तिच्यावर भाष्य केले आहे. करण सध्या ‘किल’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉचच्या कार्यक्रमासाठी एकत्र टीम व करण जोहर एकत्रित आले होते. त्यावेळी करणला कंगनाबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत विचारले. त्यावर करणने सांगितले की, “मी कोणत्याही मौखिक किंवा शारीरिक हिंसेचे समर्थन करत नाही”. करणच्या या विधनावरुन तो कंगना किंवा कुलविंदर यापैकी कोणालाही पाठिंबा देत नाही.
कंगना व करण यांच्यामध्ये खूप वर्षांपासून वैर आहे. करणने कंगनाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावरही चर्चा सुरु झाली. करणच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले की, “आता काय बोलणार, जर बोलला तर बॉयकॉट होईल”, तसेच अजून एका नेटकाऱ्याने लिहिले की, “सापही मेला आणि काठीही नाही तुटली”.
दरम्यान आता ज्या महिला कॉन्स्टेबलने कंगनाच्या कानखाली मारले तिला निलंबित करण्यात आले आहे. कंगनाविरोधातही खलिस्तानी आंदोलन म्हंटल्यामुळे तिच्यावरही तक्रार दाखल करण्यात आली आहे.