‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली किचनमध्ये अस्वस्थ असताना अर्जुन तिथे येतो आणि तिला अस्वस्थ पाहून बरं वाटत नसल्यास डॉक्टरांकडे जाण्याबद्दल विचारतो. सायली अर्जुनला सांगते, मला बरं वाटतंय पण या घरात आल्यापासून या घरी आधीही खूपदा आल्याची माझ्या मनात वेगळीच भावना येत आहे. यावर अर्जुन, याआधीही या घरी येऊन गेली असल्यामुळे तुला असं वाटत असावं, असं सायलीला सांगतो. पण स्वयंपाकघरात कधीच आली नसल्याचे आणि तरी हे स्वयंपाकघर मला ओळखीचे वाटत असल्याचे सायली अर्जुनला सांगते. (Tharal Tar Mag Serial Update)
खूप उशीर झाला असून जेवायचे बघते असं सायली अर्जुनला सांगते आणि अर्जुनही सगळ्यांसाठी पाणी घेऊन जातो. दुसरीकडे तन्वी म्हणजेच प्रिया अस्मितासमोर आईच्या आठवणीत खोटे रडण्याचे नाटक करते. अस्मिता तन्वीला प्रतिमा आत्यासारखी तर सायली वागत आहे आणि तू मात्र तुझ्या आईसारखी वागत नसल्याची शंका बोलून दाखवते. सायली कशी प्रतिमासारखी आणि तुझ्यात काहीच असं दिसत नसल्याचंसुद्धा अस्मिता तन्वीला बोलून दाखवते. त्यावर तन्वी ही सायली फक्त नाटक करत असल्याचं अस्मिताला सांगते. एकीकडे रविराज भूक नसल्याचे सांगतो. सायली स्वतः पुढाकार घेऊन रविराज सरांना दोन घास तरी खायची विनंती करते. पण पूर्णा आईसुद्धा भूक नसल्याने सायलीला साफ नकार देते.
अर्जुन पुन्हा जेवण्याबद्दल रविराजला विनंती करतो. इतकंच नाही तर तुम्ही दोघे न जेवता राहिल्यास घरात तन्वीसकट कोणीच जेवणार नाही, असंही अर्जुन पूर्णा आईला सांगतो. आपण असे स्वतःच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करत हाल केल्यास प्रतिमाला काय वाटेल असंही सायली समजवायचा प्रयत्न करते. अखेर पूर्णा आई तयार होतात आणि रविराजला सांगतात, आपण थोडं खाऊन घेऊया. अर्जुन पूर्णा आईला जेवायला बसवतो. दुसरीकडे साक्षी महिपतला जेलमध्ये प्रतिमाचे प्रेत सापडलं असल्याचे सांगायला येते. त्यावर महीपत हे खोटं असल्याचं तिला सांगतो. कारण त्याने स्वतः प्रतिमाला जाळून मारल्याचे तो साक्षीला सांगतो. त्यावर साक्षी हे प्रेत नक्की कुणाचं असा सवाल करते. किल्लेदार आणि सुभेदार दुःखात गाफील असताना अर्जुनसाठी परिस्थितीचा फायदा घ्यायला महीपत साक्षीला सांगतो. दुसरीकडे घरी येऊन कल्पना अश्विनकडे प्रतिमाबद्दल दुःख व्यक्त करते. इथे सायली स्वतः रविराजला जेवण पुढे करत तब्येतीची हेळसांड केलेली प्रतिमाला आवडणार नाही त्यामुळे जेवायाला हवं, असं बजावते. अखेर रविराज सर्वांबरोबर जेवायला बसतो. इथे साक्षी चैतन्यला दूध घे बरं वाटेल असं सांगते.
चैतन्य मात्र कोणाची मनस्थिती ठीक नसून माझेही अर्जुनशी पुन्हा बोलणे न झाल्याचे साक्षीला सांगतो. त्यावरुन साक्षीला चैतन्य व अर्जुन यांच्यात काहीतरी सुरु असल्याचा संशय येतो. ती लगेच कल्पनाला फोनकरुन चैतन्यकडून रविराजचे कळले असून वाईट वाटल्याचे सांगते. शिवाय साक्षी कल्पनाकडून चैतन्यला सांगितल्याची शहानिशा पण करते तेव्हा ती काही कळवले नसल्याचे साक्षीला सांगते. घरात वावरत असताना सायलीला पुन्हा लहानपणीचे भास होतात. मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, सायली प्रियाला म्हणजेच तन्वीला रात्री फेक रिपोर्ट्सबद्दल नर्सशी बोलताना ऐकते आणि सर्वांसमोर त्याबद्दल तिला जाब विचारते.