रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिवाच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला पाहिलंत का?, रजिस्टर पद्धतीने केलं लग्न, अभिनेत्रीचा नवरा करतो ‘हे’ काम

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 11, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Purva phadke husband

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ या मालिकेला प्रेक्षक पसंती देत आहेत. मालिकेच्या कथानकावर आणि शिवा या पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. या मालिकेत शिवा हे पात्र अभिनेत्री पूर्वा फडके साकारत आहे. शिवा या मालिकेतून पुर्वा घराघरात पोहोचली. अभिनेत्रीने ‘शिवा’ या मालिकेआधी ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘अजूनही बरसात आहे’, ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र पूर्वा शिवा या मालिकेतून मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसत आहे. (Purva phadke husband)

शिवा हे पात्र साकारत पूर्वाने प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. तर शिवाची स्टाईल, तिचं वागणं, बोलणं आणि मदतीसाठी कायम तत्पर असणं प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी शिवाने तिचा लूक खरंच बदलला आहे. अभिनेत्रीने हवा तसा लूक यावा म्हणून आणि भूमिका उत्तम दिसावी म्हणून केसही कापले आहेत. याबाबतचा खुलासा तिने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. या व्यतिरिक्त पूर्वा ‘क्लिक’ या माईम ऍक्ट द्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

आणखी वाचा – वडिलांचा विरोध, प्रेमविवाह अन्…; लग्नाच्या पाच वर्षांनी ‘या’ कलाकार जोडीचा घटस्फोट, अभिनेत्याचे पत्नीवर गंभीर आरोप

View this post on Instagram

A post shared by Purva kaushik (@kaushikpurva14)

सध्या शिवा या मालिकेत आशु व शिवाची लगीनघाई पाहायला मिळत आहे. मालिकेत शिवाच्या बहिणीचं आशुबरोबर लग्न होणार असतं मात्र ऐनवेळी आशुची शिवाशी लगीनगाठ बांधली जाते. मालिकेतील शिवाचं खऱ्या आयुष्यातही लग्न झाले आहे. खऱ्या आयुष्यात पूर्वाच लग्न झालं असून तिचा नवराही सिनेविश्वात कार्यरत आहे. पूर्वाचं लग्न प्रकाशयोजनाकार अमोघ फडकेसह झालं आहे. त्यांच्या लग्नाला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

आणखी वाचा – प्रसाद जवादे पुरवतोय बायकोचे लाड, नाश्ताला खास पदार्थही बनवला, साताऱ्याही थाटलाय नवा संसार

अभिनेत्रीचा नवरा विविध नाटकांसाठी लाईट्सचं काम पाहत आहे. अमोघला या क्षेत्राशी निगडित म्हणजेच ‘झी नाट्य गौरव’ सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना व्यावसायिक नाटक जन्मवारी हा पुरस्कार मिळाला आहे. तर याचसह अमोघने आजवर ‘जर तरची गोष्ट’, ‘चर्चा तर होणारच’, ‘कुर्रर्रर्र’ या व अश्या बऱ्याच नाटकांसाठी प्रकाशयोजनाची धुरा सांभाळली आहे. पूर्वा व अमोघ यांचं वैवाहिक आयुष्यही आनंदात सुरु आहे. आपापल्या कामातून ब्रेक घेत दोघेही क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसतात.

Tags: amogh phadkemarathi serialpurva phadkePurva phadke husbandshiva serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update Netra Learns Why Virochak Wasn't Killed

अस्तिकट्यार नष्ट करण्याचा रुपालीचा प्रयत्न, विरोचकाच्या खेळीत राजाध्यक्ष कुटुंब फसणार, मात्र नेत्रा खेळणार नवा डाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.