‘ठरलं तर मग’ मालिकेच्या भागात असे पाहायला मिळत आहे की, सायलीच्या साडीवर तेल सांडल्याने सुमन तन्वीच्या खोलीत जाऊन साडी बदलायला सांगते. सायली तन्वीच्या खोलीत येताच तिला प्रतिमाची साडी दिसते आणि सायली ती साडी नेसते. नागराज प्रतिमाच्या फोटोला हार घालायला रविराजला सांगतो इतक्यात तिथे सायली येते आणि सायलीला प्रतिमाच्या साडीत पाहून पूर्णाआई प्रतिमा असं बोलून जाते. सायलीला प्रतिमा समजून पूर्णा आजी अगदी तिचे लाड करते. हे पाहून प्रियाला म्हणजेच तन्वीला राग येतो आणि ती सायलीला साडी बदलायला सांगते. (Tharal Tar Mag Marathi Serial)
त्यावर अर्जुन तिने मुद्दाम केलं नसल्याचं सांगतो. पण तन्वी सायलीवर हात उगारते आणि पूर्णाआई तो हात झटकते. पूर्णा आई पुढे बोलते की, ही साडी असुदे हिच्या रूपाने माझी प्रतिमा परत आली आहे. प्रतिमाच्या फोटोला हार नको घालूया, असंही पूर्णाआजी रविराजला सांगते. तन्वी मनोमन प्रतिमाची खोटी बॉडी मिळवायला काय केलं आहे हे आम्हालाच माहिती असं मनातल्या मनात बोलते. कुणाच्या रूपात का होईना आपल्याला प्रतिमाचं अस्तित्व जाणवलं आहे असंही पूर्णा आजी सायलीसमोर बोलते. आपण कधीच तिच्या फोटोला हार घालू नये म्हणून असे संकेत ती देत आहे. आपल्यासाठी प्रतिमा कायमच जिवंत राहणार असल्याचंसुद्धा पूर्णा आजी रविराजला सांगते.
हार नका घालू असं मात्र ठामपणे पूर्णा आजी रविराजला सांगते. नागराज रविराजला हाराबद्दल सांगायला जातो, तेवढ्यात रविराज भावनांना कधीही मरण नसतं असं नागराजला सांगतो. यापुढे कुणीही प्रतिमाच्या फोटोला हार न घालता ती कायमच आपल्यासाठी जिवंत राहील असंही पुढे रविराज सांगतो. रविराजला जुने सगळे प्रतिमाचे क्षण आठवतात. सायली पूर्णा आजीच्या काळजीपोटी औषधाबद्दल सांगते तेवढ्यात तन्वी काही गरज नाही मी घेईन काळजी असं सांगते. यावर सायली तिला तू त्या मनस्थितीत नसल्याचे सांगते. रविराज पूर्णा आईला प्रतिमाही अशीच काळजी घ्यायची असं सांगतो. त्यावर पूर्णाआजीसुद्धा हो तिला माझं सर्व माहिती होतं अशीच ती काळजी घ्यायची असं रविराजला सांगते. तिला सर्व माहिती असायचे पण आता…, असं पूर्णा आजी म्हणताच, आता फक्त सायलीला माहिती असतं, असं कल्पना पूर्णा आजीला सांगते.
इतका सारखेपणा सायलीत आणि प्रतिमात कसा याबद्दल रविराज आश्चर्य व्यक्त करतो. त्या दोघींचा खूप जवळचा संबंध आहे आणि हे बाहेर आलं तर आपलं काही खरं नाही असं मनातल्या मनात तन्वी पुटपुटते. सायली आणि अस्मिता किल्लेदारांच्या घरी थांबायचं असं म्हणतात. कल्पना अश्विन मात्र रविराजला काळजी घ्यायचे सांगून निघून जातात. आता मालिकेच्या पुढील भागात सायलीला स्वयंपाकघरात काम करताना लहानपणीचे भास होतात. प्रतिमाला तुम्ही उपाशी असलेले आवडणार नाही म्हणून सायली स्वतःच्या हाताने रविराजला खाऊ घालते.