‘शिवशक्ती – तप तांडव त्याग’ ही मालिका हिंदी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. ही मालिका टीआरपीच्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेला प्रेक्षक वर्ग भरभरुन प्रतिसाद देताना पाहायला मिळतात. मालिकेतील कलाकारांवरही प्रेक्षक प्रेम करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ‘शिवशक्ती’ या मालिकेत पार्वतीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री सुभा राजपूत हिचा अभिनेता विभय रायबरोबर साखरपुडा मोडला. (Subha Rajput Broke Engagement)
त्यामुळे सुभा पुन्हा एकदा वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळाली. ५ डिसेंबर २०२२ रोजी सुभाने विभवसह साखरपुडा सोहळा उरकला होता. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने नातं तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर आलं आहे. ‘शिवशक्ती – तप तांडव त्याग’मध्ये माता पार्वतीची भूमिका करुन सुभाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अशातच अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नापूर्वी बाळाच्या प्लॅनिंगबद्दल भाष्य केलं आहे.
वयाच्या ३०व्या वर्षी सुभा राजपूत ‘शिव शक्ती – तप तांडव त्याग’ या टीव्ही मालिकेत तीन मुलांच्या आईची भूमिका साकारत आहे. पिंकविलाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिला खऱ्या आयुष्यात लग्न आणि मुलांबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्रीने अतिशय आश्चर्यकारक उत्तर दिले. यावेळी बोलतानाव सुभा म्हणाली, “मला मूल हवं आहे आणि यासाठी लवकरच मी प्लॅनिंग करेल”.
ती पुढे असेही म्हणाली की, “मी आयुष्यात खूप काही सहन केलं आहे. अशातच आता सर्व गोष्टी विचारपूर्वक हँडल करायला मी सुरुवात केली आहे. आता मी आयुष्यात माझा दृष्टिकोन बदलला आहे. आतापर्यंत माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. काही माझ्यासाठी चांगले सिद्ध झाले यासाठी मी खूप खुश आहे”. वयाच्या ३०व्या वर्षी सुभाने ‘शिवशक्ती तांडव’ या मालिकेत तीन मुलांच्या आईची भूमिका साकारली आता अभिनेत्रीनेखऱ्या आयुष्यात लग्नाआधीच मूल हव असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.