शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : इतकी मोठी झाली आहे अनुष्का शर्मा व विराट कोहलीची लेक, दुसऱ्या बाळानंतर पहिल्यांदाच समोर आला व्हिडीओ, रंगली चर्चा

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 8, 2024 | 4:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
anushka sharma and virat kohli daughter

Video : इतकी मोठी झाली आहे अनुष्का शर्मा व विराट कोहलीची लेक, दुसऱ्या बाळानंतर पहिल्यांदाच समोर आला व्हिडीओ, रंगली चर्चा

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा व भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे सध्या त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या येण्याने अधिक चर्चेत आहेत. यायाआधी विराट व अनुष्काला एक मुलगी असून तिचे नाव वामिका असे आहे. वामिकाच्या जन्मानंतर खूप काळ दोघांनीही मुलीचा चेहरा माध्यमांसमोर येऊ दिला नव्हता. त्यानंतर वामिका ३ वर्षाची होताच दोघांनी दुसरे मुलं जन्माला येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर १५ फेब्रुवारीला अनुष्काने लंडन येथे मुलाला जन्म दिला. त्याचे नाव अकाय असे ठेवण्यात आले. मुलाच्या येण्याची बातमी अनुष्का व विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. (anushka sharma and virat kohli daughter)

कोहली कुटुंबामध्ये चिमुकल्याचे आगमन झाल्याने सगळ्यांनीच कोहली कुटुंबाचे अभिनंदन केले होते. पण अकायच्या जन्मानंतर अनुष्का व विराट हे भारतात दिसले नाहीत. ते आता आपल्या दोन्ही मुलांबरोबर लंडनमध्येच शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण या चर्चावर अनुष्का व विराट यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सध्या विराट T20 वर्ल्डकपसाठी न्यूयॉर्कमध्ये आहे. त्याच्याबरोबर अनुष्का, वामिका व अकाय हेदेखील आहेत. सध्या या कुटुंबाचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – विराट कोहली व अनुष्का शर्मा भारत सोडणार?, लंडनमध्येच स्थायिक होणार असल्याची चर्चा, लेकाचा जन्मही परदेशातच झाला अन्…

A few days before Virushka and Vamika were spotted at the Team Hotel 🥰❤️ pic.twitter.com/kv6uBSPJti

— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) June 7, 2024

या व्हिडीओमध्ये विराट व अनुष्का यांच्यापेक्षा त्यांची मुलगी वामिकाची चर्चा सर्वाधिक सुरु आहे. आतापर्यंत विराट व अनुष्काने मुलीला लाईमलाइटपासून दूर ठेवले आहे. समोर आलेला व्हिडीओ हा न्यूयॉर्क येथील हॉटेलमधील आहे. क्रिकेटच्या सरावातून वेळ काढत विराट पत्नी व मुलांबरोबर वेळ घालवत आहे.सदर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का व विराट आपल्या लहानग्या मुलीबरोबर दिसून येत आहेत. दोघांनीही वामिकाचे हात पकडले असून तिला चालत घेऊन जाताना दिसत आहेत.वामिकाने पांढऱ्या रंगाचा टॉप व जीन्स घातलेली दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी खूप पसंती दर्शवली आहे.

आणखी वाचा – “आपल्याच लोकांशी आपला लढा”, दमदार डायलॉगबाजी असलेला ‘आम्ही जरांगे’चा ट्रेलर प्रदर्शित, सुबोध भावे, प्रसाद ओकचीही दिसली झलक

तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये विरुष्का व वामिका स्पॉट झाले होते”. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “वामिका किती गोड दिसत आहे”, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, “तिचे बांधलेले केस किती गोड दिसत आहेत”.

अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, वामिकाच्या जन्मानंतर ती अभिनयापासून थोड्या प्रमाणात लांब असलेली दिसून आली. सध्या ती चित्रपटनिर्मितीमध्ये आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत.

Tags: anushaka sharmadaughtervamikavirat kohli
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Maharashtrachi Hasyajatra fame Dattu More talk about his first entry in the show.

“त्या रात्री मी खूप रडलो आणि...” दत्तू मोरेने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “काम मिळत नसल्याचा त्रास...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.