रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उन्हाळयाच्या सुट्टीसाठी अलिबागला पोहोचले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सुप्रसिद्ध कलाकार, गावामध्ये राहिले अन्…; फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 8, 2024 | 4:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra Team

उन्हाळयाच्या सुट्टीसाठी अलिबागला पोहोचले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील सुप्रसिद्ध कलाकार, गावामध्ये राहिले अन्...; फोटो व्हायरल

सध्या उष्णतेचं वाढतं प्रमाण अनेकांच्या आरोग्यास हानिकारक ठरत आहे. अशावेळी या उष्णतेपासून पळ काढण्यासाठी अनेकजण निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जाताना दिसत आहेत. तर अनेकजण उष्णेतपासून सुटका म्हणून विविध उपाय करताना दिसत आहेत. अशातच या उष्णतेला कंटाळून आता कलाकार मंडळीही त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळ काढत फिरायला गेले असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कलाकार मंडळी सहन न होणाऱ्या या उन्हाळ्यातून पळ काढत निसर्गाच्या सान्निध्यात पोहोचले आहेत. (Maharashtrachi Hasyajatra Team)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. आजवर या कार्यक्रमातील कलाकारांनी आणि कार्यक्रमातील कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या कार्यक्रमाचे जगभरात लाखो दिवाने चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आता केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित न राहता जगभरात देखील लोकप्रिय ठरत आहे. या कार्यक्रमाचे महाराष्ट्रासह परदेशातही दौरे होत असतात.

आणखी वाचा – कंगना रणौतने स्वतःवर झालेल्या हल्ल्याची बलात्काराशी केली तुलना, अभिनेत्री पुन्हा बरळली, म्हणाली, “तुमचं मानसिक आरोग्य…”

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

ही हास्यजत्रेतील कलाकार मंडळी सध्या त्यांच्या व्यस्त श्येड्युलमधुन वेळात वेळ काढत अलिबाग येथे फिरायला गेली आहेत. अभिनेत्री वनिता खरातने त्यांचा एकत्र एन्जॉय करतानाचा एक फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. वनिताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये वनितासह तिचा नवरा सुमित लोंढे, रोहित माने आणि त्याची बायको, रसिका वेंगुर्लेकर आणि तिचा पती सनी शिंदे, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत ही कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – ’बिग बॉस मराठी’ फेम माधव देवचकेची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री, वकिलाच्या भूमिकेत दिसणार, नवा लूक समोर

या फोटोमध्ये ही कलाकार मंडळी एकत्र धमाल करताना दिसत आहेत. यावेळी गरमीपासून बचाव म्हणून नारळपाणी पिताना दिसत आहेत. सध्या ही मंडळी अलिबाग येथील चौल गावात सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. हास्यजत्रेतील सगळीच कलाकार मंडळी नेहमीच एकत्र फिरताना दिसतात. बरेचदा ही मंडळी त्यांच्या परदेशात दौऱ्यानिमित्त जातात तेव्हाही तिथे एकत्र फिरताना दिसतात.

Tags: maharashtrachi hasyajatraMaharashtrachi Hasyajatra Teammarathi actormarathi actressmhj
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bollywood actor Ranbir Kapoor thrown away paparazzi's phone many times, know more about those incidents

Video : अर्ध्या रात्री पाठलाग केला म्हणून रणबीर कपूरने कॅमेरामॅनचा फोनच फेकून दिला होता अन्…; जुना व्हिडीओ व्हायरल, काय घडलं होतं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.