रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कलाकार होणे कठीण आणि…”, अपूर्वा नेमळेकरने ‘प्रेमाची गोष्ट’मधला लूक शेअर करत लिहिलेली पोस्ट चर्चेत, म्हणाली, “कधीकधी…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 6, 2024 | 5:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Premachi Goshta fame Apurva Nemalekar written a post saying that being an artist is difficult.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्यांनूृी मुंबई-पुणे हायवेवर गमावला होता जीव, जीवघेण्या अपघाताच्या वेळी तेव्हा काय घडलं होतं?, अजूनही विसरणं कठीण

‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारली होती. तिने साकारलं हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं. या लोकप्रिय मालिकेनंतर अपूर्वा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, या मालिकेत अभिनेत्री सावनी हे पात्र साकारत आहे.

आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी अपूर्वा सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा चांगलाच चाहतावर्ग आहे. अभिनेत्री तिच्या  फोटो व व्हिडीओसह अनेक विविध पोस्टही शेअर करत असते. अशातच अपूर्वाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिच्या सावनी या भूमिकेमधील काही फोटो शेअर केले असून या फोटोखाली तिने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे आणि तिने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

आणखी वाचा – टीव्हीवर आली बिनधास्त मुलगीची आजी, सेलिब्रिटीही आहेत तिचे फॅन, स्टेजवर जाताच अलका कुबल यांना घट्ट मिठी मारली अन्…

या पोस्टमध्ये अपूर्वाने असं म्हटलं आहे की, “कलाकार होणे कठीण” आहे. त्यासाठी कठोर परिश्रम, संयम, सराव, प्रेरणा, समर्थन आणि स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य त्याचबरोबर आपल्याला पाहिजे तसे जगण्याचे स्वातंत्र्य आवश्यक आहे. कधीकधी तुम्ही समाजाच्या चौकटीत बसत नाही, कारण त्यात राहणे तुम्हाला पिंजऱ्यासारखे वाटते. एका कलाकाराला त्या बेड्या तोडून स्वतःचे जग निर्माण करण्याची सतत इच्छा असते, जे सर्वसामान्यांपेक्षा वेगळे असते”.

आणखी वाचा – अक्षरा आजीकडून शिकत आहे कोल्हापूरी भाषा, अधिपतीला प्रपोज करत देणार सरप्राइज, नव्या नात्याला लवकरच सुरुवात

यापुढे तिने असं म्हटलं की, “एक असे जग जिथे कला निर्बंध किंवा संघर्षांशिवाय असेल. त्यांना समाजाचे नियम समजत नाहीत; ते त्यांना प्रश्न करतात. पण त्यांना गप्प राहण्यास सांगितले जाते. ते त्यांच्या कलेतून आवाज उठवतात आणि त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनेकदा हिरावून घेतले जाते. मग फक्त दोन पर्याय उरतात. एकतर गप्प राहा आणि नियमांचे पालन करा किंवा ते नियम तोडून स्वतःचे जग तयार करा”.

Tags: Apurva Nemalekarmarathi actressmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
big boss ott 3

'बिग बॉस ओटीटी'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार?, काही कलाकारांची नावं समोर?, यावेळी शोमध्ये येणार मोठा ट्वीस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.