शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरात फक्त मोठ्या बहिणीच्याच शब्दाला असतो मान; क्रांती रेडकरने व्हिडीओ शेअर करत सिद्धही केलं, व्हिडीओ पाहून तुम्हालाटी पटेल

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 6, 2024 | 2:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kranti redkar on sister

घरात फक्त मोठ्या बहिणीच्याच शब्दाला असतो मान; क्रांती रेडकरने व्हिडीओ शेअर करत सिद्धही केलं, व्हिडीओ पाहून तुम्हालाटी पटेल

मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकरचं नाव आवर्जून घेतलं जातं.  आजवर तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रसंग ती चाहत्याबरोबर शेअर करत असते. तसेच समाजातील अनेक विषयांवरही ती आपले परखड मत मांडत असते. क्रांतीला दोन जुळ्या मुली आहेत. त्यांच्याबरोबरचेही अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या सर्व व्हिडीओंना चाहत्यांची खूप पसंती मिळते. अशातच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (kranti redkar on sister)

क्रांती इन्स्टाग्रामवर नेहमी व्हिडीओ पोस्ट करत असते. आपल्या घरातील, आजूबाजूचे अनेक प्रसंग, तसेच मुलींच्या गमती-जमती ती चाहत्यांना सांगत असते. अशातच आता तिने आता बहिणीबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आईच्या हट्टीपणाबद्दल बोलताना दिसत आहे. यामध्ये ती म्हणाली की, “आपल्या प्रत्येकाच्या घरात एक जबाबदार व्यक्ती असते. तसेच असे एखादे घर असतेच जिथे आपले आई-वडील आपलं ऐकत नाहीत पण दुसऱ्या व्यक्तीचं ऐकतात. आमच्या घरी मी माझ्या आईला कितीही काहीही सांगितलं तरीही ते ऐकत नाहीत.पण ताईने तीच गोष्ट जर आईला सांगितली तर आई मात्र लगेच ऐकते. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर, माझ्या आईच्या बेडरुममधला एसी खराब झाला होता. माझ्या आईने मला लगेच फोन करुन सांगितला म्हणाली मुन्ना रुममधला एसी खराब झाला आहे. त्या ‘व्हलपूल’वाल्या माणसाला फोन कर आणि काम करण्यासाठी बोलावून घे. त्यावर मी तिला म्हणाले की दुरुस्त करण्यापेक्षा नवीन घेऊया. त्यावर आई मला म्हणाली की तुला काही कळत नाही. मला काही शिकवू नकोस. मी ठीक आहे म्हणाले आणि दुरुस्त करण्यासाठी बोलवते असं सांगितलं”.

आणखी वाचा – Video : क्रांती रेडकर एकापाठोपाठ एक बोलत होती खोटं, नवऱ्याने तोंड वाकड करत कॅमेऱ्यासमोरच बायकोला ठरवलं खोटं, व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आणखी वाचा – “मिठी मारायचे, किस करायचे अन्…”, ‘हिरामंडी’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं संजय लीला भन्साळींबाबत भाष्य, म्हणाली, “सेटवर ते…”

त्यानंतर थोड्या वेळात पुन्हा आईचा फोन आला आणि म्हणाली की आपण नवीन एसी घेऊया. मी ताईबरोबर बोलले आणि ती म्हणाली नवीन एसी घेऊया. मी देखील हेच सांगितलं होतं. मात्र तिने ताईचं शांतपणे सांगितलेलं सगळं ऐकलं”. तसेच तिने चाहत्यांनाही विचारलं की, “तुमच्या घरात अशी एखादी व्यक्ती आहे का?” , क्रांतीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत तसेच पसंतीदेखील दर्शवली आहे.

क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या क्रांती अभिनय, नृत्याबरोबरच दिग्दर्शन क्षेत्रातही आपली एक वेगळी जागा निर्माण करत आहे. तिने दिग्दर्शित केलेला ‘रेनबो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी तिने ‘काकण’ या चित्रपटाचे दिग्दर्शक केले आहे.

Tags: kranti redkarmarathi actresssocial media
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Content creator bindhast mulgi aka Gauri Pawar shared a post about her grandmother's wish to meet actress Alka Kubal.

टीव्हीवर आली बिनधास्त मुलगीची आजी, सेलिब्रिटीही आहेत तिचे फॅन, स्टेजवर जाताच अलका कुबल यांना घट्ट मिठी मारली अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.