झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. मालिकेत दिवसेंदिवस येणाऱ्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत नुकताच एजे व श्वेता यांच्या लग्नाचे कथानक सुरु असल्याचे पाहायला मिळाले. मात्र एजे व श्वेताऐवजी एजे व लीला यांचे लग्न होणार असल्याच्या ट्विस्टने मालिकेत चांगलीच रंगत आणली.
लीलाला अभिरामच्या लग्नात बोलवण्यासाठी विक्रांतने रेवतीला किडनॅप केले आहे. रेवतीच्या जीवाची धमकी देत विक्रांतने लीलाला एजेच्या लग्नात बोलवलं आहे. त्यामुळे लीला आपल्या बहिणीच्या काळजीपोटी धावत धावत लग्नात पोहोचणार आहे. रेवतीला सुखरूप सोडवण्याच्या बदल्यात लीलाला एजेशी लग्न करावं लागणार आहे. मात्र, एजेचं लग्न काही वेळातच होणार असून, आपण तिथे कसं काय उभं राहणार, असा प्रश्न लीलाला पडला होता. मात्र, कशाचाही विचार न करता लीला धावत धावत मंडपापर्यंत पोहोचली आहे.
आणखी वाचा –
आणखी वाचा – वृषभ, कन्या, तूळ राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस भाग्याचा, महत्त्वाचे कामे पूर्ण होणार, जाणून घ्या…
अशातच आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये एजेला त्याचं लग्न श्वेताऐवजी लीलाशी झालेले कळत आहे. त्यामुळे तो तिच्यावडर भयंकर चिडल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय लीला तिला तिच्या बहिणीच्या काळजीपोटी एजेशी लग्न करावे लागले असल्याचे समजावून सांगते. मात्र एजेला लीलावर विश्व बसत नाही. त्यामुळे एजे लीलाला तने त्याचा विश्वासघात केल्याचे बोलतात. तसेच यावेळी एजे लीलाला “माझी चूक झाली की मी तुझ्यावर विश्वास ठेवला” असं म्हणतात.
त्यामुळे आता एजेचे श्वेताऐवजी लीलासह लग्न झाल्याने मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे. मात्र लीलाने एजेचा विश्वासघात केल्याचे त्यांना वाटत आहे. त्यामुळे आता मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार?, लीला एजेला पटवून देणार की, तिला हे लग्न का करावे लागले? तसेच लीलाला एजेच्या सूना घरात सांभाळून घेणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.