बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हा नेहमी चर्चेत असतो. त्याने आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. १९९१ साली तो अभिनेत्री अमृता सिंहबरोबर लग्नबंधनात अडकला. मात्र काही वर्षातच म्हणजे २००४ साली दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांची मुलं सारा व इब्राहिम दोघंही आईकडे म्हणजे अमृताकडे राहू लागले. आता सारा ही बॉलीवूडमध्ये चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. दोघांच्याही घटस्फोटाला २० वर्ष झाली आहे. या २० वर्षांमध्ये सैफ व अमृता अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्रित दिसून आले आहेत. आता नुकताच अमृता यांनी घटस्फोटाच्या इतक्या वर्षानंतर त्यामागील कारण सांगितलं आहे. (amrita singh on second marriage)
सैफने २०१२ साली करीना कपूरबरोबर लग्न केले. दोघांना तैमुर व जेह अशी दोन मुलं आहेत. मात्र सारा व इब्राहिम यांच्याबरोबरदेखील खास बॉंड आहे. अशातच आता अमृताने दुसरं लग्न करण्याबद्दल भाष्य केले आहे. अमृता यांनी नुकताच पूजा बेदीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वतःच्या खासगी आयुष्यावर भाष्य केले. अमृता म्हणाल्या की, “मला भाविष्यात लग्न करायचे नाही. पण कधी काय होईल हे सांगता येत नाही. मी काय आता १६ वर्षाची मुलगी नाही आहे. पण पुन्हा मी लग्न करणार नाही”.
पुढे त्या म्हणाल्या की, “तुम्ही भविष्याबद्दल काहीही सांगू शकत नाही. खर तर माझ्याकडे ते सर्व आहे जे मला एखादा पुरुष देऊ शकतो. हा काही गोष्टी नाही आहेत. पण त्यासाठी मला आता लग्न करण्याची गरज नाही”. पूजाने पुढे तिला प्रश्न विचारला की, “जर तुम्ही दुसरं लग्न केलंत तर करियर सोडाल का?”, त्यावर अमृता म्हणाली की, “नाही. यासाठीच मला दुसरं लग्न करायचं नाही. मला हे माहीत असावं की माझी बिल्स भरणारं कोणीही नाही. त्यामुळे मला काम करणं गरजेचं आहे”.
अमृता यांनी सैफबरोबर लग्न केल्यानंतर तब्बल १२ वर्ष अभिनय सोडला होता. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. त्या ‘शूटआऊट अट लोखंडवाला’, ‘दस कहानिया’, ‘कलियुग’ या चित्रपटांमध्ये दिसून आल्या होत्या.