शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Lok Sabha Election 2024 : मंडीमधून कंगना रणौत तर मथुरामधून हेमा मालिनी आघाडीवर, अरुण गोविल यांचं काय होणार?, कोण मारणार बाजी?

Saurabh Moreby Saurabh More
जून 4, 2024 | 1:51 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
Lok Sabha Election Result 2024 The attention is on Kangana Ranaut, Hema Malini, Arun Govil and Ravi Kishan.

Lok sabha Election 2024 : मंडीमधून कंगना रणौत तर मथुरामधून हेमा मालिनी आघाडीवर, अरुण गोविल यांचं काय होणार?, कोण मारणार बाजी?

देशात नुकताच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली असून आज ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.  सध्या मतमोजणी सुरू आहे. यंदाच्या या निवडणुकीच्या रिंगणात बॉलिवूडमधील काही कलाकारांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कंगना राणौत, हेमा मालिनी व अरुण गोविल यांचा समावेश आहे. त्यामुळे या कलाकार मंडळींच्या निकालाबाबत सऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक कलाकार रिंगणात उतरले होते. बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने मंडी मतदारसंघातून आणि अरुण गोविल यांनी मेरठसारख्या जागांवरून निवडणूक लढवली आहे. तर अभिनेत्री हेमा मालिनी आणि अनेक भोजपुरी कलाकारांनी मथुरा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे लवकरच उमेदवारांच्या विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

मंडी मतदार संघातून अभिनेत्री कंगणा रनौत ४२८५१ मतांनी आघाडीवर आहे. तर गोरख मतदार संघातून अभिनेते रवी किशन हे २१०४२ मतांनी आघाडीवर आहेत. याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरा मतदारसंघातून १३४६४४ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच ‘रामायण’ फेम अरुण गोविल हे मथुरा मतदारसंघातून १५९१४ मतांनी आघाडीवर आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dream Girl Hema Malini (@dreamgirlhemamalini)

आणखी वाचा – “नाचता काय थेरड्यांनो”, डान्स व्हिडीओवर घाणेरडी कमेंट करणाऱ्यावर अविनाश नारकर भडकले, म्हणाले, “बोलण्यात सभ्यता…”

भोजपुरी अभिनेते दिनेश लाल यादव बिहारच्या करकट मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून पुढे आहेत. आझमगढमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणारे दिनेश लाल यादव हे सपाचे धर्मेंद्र यादव यांच्यापेक्षा मागे आहेत. ते ३८८९३ मतांनी पिछाडीवर आहेत. तसेच करकट मतदारसंघातून पवन सिंह ४१८२५ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या जागेवर राजाराम सिंह हे १६००३ मतांनी आघाडीवर आहेत.

आणखी वाचा – नेत्रा होणार आई, राजाध्यक्ष कुटुंब आनंदात असतानाच रुपालीची घरामध्ये एन्ट्री, देवीआईकडून पुन्हा नेत्राला संकेत, आता कोणतं संकट?

दरम्यान, १९ एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू झाले. तर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान झाले होते. सध्या आतापर्यंतच्या वृत्तानुसार, एनडीए आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासांनंतर चित्र स्पष्ट होणार असून, कोण या लढतीत विजय मिळवणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे.  

Tags: Arun Govilhema malinikangana ranautLok Sabha Election Result 2024 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Tula shikvin changlach dhada promo comment

"आता विषय हार्ड", कोल्हापूरी भाषेत अक्षराने अधिपतीला प्रेमाची कबुली देताच प्रेक्षकांनाही भलताच आनंद, म्हणाले, "अखेर दोघं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.