शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता-सावनीचं सुरु असतं भांडण, पण खऱ्या आयुष्यात दोघींमध्ये कसं आहे नातं?, अपूर्वा म्हणाली, “जेव्हा मला गरज असते…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 3, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Apurva Nemlekar On Tejashri pradhan

'प्रेमाची गोष्ट'मध्ये मुक्ता-सावनीचं सुरु असतं भांडण, पण खऱ्या आयुष्यात दोघींमध्ये कसं आहे नातं?, अपूर्वा म्हणाली, "जेव्हा मला गरज असते..."

मालिकांच्या टीआरपीमध्ये सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. मालिका सुरु झाली तेव्हापासून या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. या मालिकेत यामध्ये तेजश्री प्रधान, राज हंसनाळे, अपूर्वा नेमळेकर यांच्या व्यतिरिक्त शुभांगी गोखले, संजीवनी जाधव ही कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. मालिकेतील तेजश्री व राज म्हणजेच मुक्ता व सागर या जोडीवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. (Apurva Nemlekar On Tejashri pradhan)

मालिकेत सागर व मुक्ता यांचं एकमेकांवरील प्रेम वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सावनी म्हणजेच सागरची पहिली पत्नी या सागरच्या वैयक्तिक नात्यात काही ना काही अडथळे आणताना दिसत आहे. सावनीला सागर व मुक्ता एकत्र आलेले नको आहेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. मात्र मुक्ताच्या पाठी सागर खंबीरपणे उभा असतो आणि तितकीच सागरला मुक्ताचीही साथ असते. पडद्यावर हे वादळासारखं असलेलं नातं मात्र पडद्यामागे शांत, निखळ असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – रवीना टंडनला मारलं, गाडी पार्किंग करण्यावरुन झालेल्या भांडणात अभिनेत्रीवर उचलला हात, कंगना रणौत म्हणते, “शिक्षा दिली पाहिजे आणि…”

नुकताच तेजश्री प्रधानचा वाढदिवस झाला. यानिमित्त अपूर्वाने खास व्हिडीओ शेअर करत तेजश्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. पडद्यावर त्यांच्यात कितीही वाद झाले असले तरी पडद्यामागे त्यांची मैत्रीही खूप निखळ आहे. तेजश्रीसाठी अपूर्वाने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “”मी ज्या व्यक्तीशी पडद्यावर सर्वात जास्त भांडते तिच व्यक्ती जी माझ्या खऱ्या आयुष्यात माझी पाठराखीण आहे. असा आधार देणारी आणि काळजी घेणारी मैत्रीण असल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा जेव्हा मला तुझी गरज असते तेव्हा माझ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मी तुझ्याबरोबर पडद्यावर भांडण्यासाठी येणाऱ्या अनेक भागांची आतुरतेने वाट पाहेन. आणि पडद्यामागची माझी-तुझी मैत्री ही कायम खास असेल”.

आणखी वाचा – “‘सातव्या मुलीची…’ मालिका संपणार?”, प्रेक्षकाने प्रश्न विचारताच ऐश्वर्या नारकरांनी दिलं खरं उत्तर, म्हणाल्या, “विरोचक सध्या…”

या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने जवळपास दोन वर्षांच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. यापूर्वी तिच्या ‘अग्गं बाई सासूबाई’, ‘होणार सून मी या घरची’ या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. आता ‘प्रेमाची गोष्ट’ या नव्या मालिकेच्या माध्यमातून तेजश्री पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवताना दिसत आहे.

Tags: apurva nemlekarApurva Nemlekar On Tejashri pradhanmarathi actresstejashri pradhan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
04 June 2024 panchang

मंगळवारी ‘मिथुन’ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळणार, तर ‘मकर’ राशीच्या लोकांची महत्त्वाची कामे पूर्ण होणार, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.