‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एका मागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता अजिंक्य ननावरे म्हणजे नेत्रा व अद्वैत या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. तर ऐश्वर्या नारकर यांच्या नकारात्मक भूमिकेलाही प्रेक्षक प्रतिसाद देताना दिसत आहेत. एकूणच या रहस्यमय अशा कथेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. या मालिकेतील नेत्रा म्हणजे अभिनेत्री तितिक्षा तावडे सोशल मीडियावरही सक्रिय बऱ्यापैकी सक्रिय असते. (Titeeksha Tawde Mangalsutra)
काही महिन्यांपूर्वी तितीक्षाचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. तितीक्षा यावेळी तिच्या लग्नामुळे विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळाली. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. अगदी थाटामाटात तसेच पारंपरिक अंदाजात डेस्टिनेशन वेडिंग करत तितीक्षा व सिद्धार्थने लग्न उरकलं. त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल होताना पाहायला मिळाले. सोशल मीडियावर सक्रिय असणारी तितीक्षा नेहमीच काही ना काही शेअर करताना दिसते.
अशातच तितीक्षाने तिच्या युट्युब चॅनेलवरुन तब्बल तीन महिन्यांनी पहिल्यांदा माहेरी जातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तितीक्षा आणि तिचा नवरा पहिल्यांदा तितीक्षाच्या माहेरी म्हणजे डोंबिवलीला जाताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे तितीक्षाचे माहेरचे घरही पाहायला मिळाले. शिवाय सासू सासऱ्यांनी जावयाचे अगदी जंगी स्वागत केलेले पाहायला मिळाले. यावेळी अभिनेत्रीच्या गळ्यातील मंगळसूत्राची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
अभिनेत्रीने घातलेल्या खास डायमंडच्या मंगळसुत्राची चांगलीच चर्चा रंगली. तितीक्षाने गळ्यात घातलेल्या या खास मंगळसूत्राच्या हटके व युनिक डिझाइनने साऱ्यांचं लक्ष वेधलं. तितीक्षाच्या गळ्यातील सरस्वतीच्या चिन्हाच्या मंगळसूत्राची सध्या चर्चा सुरु असून महिला वर्गामध्ये हे मंगळसूत्र अधिक प्रचलित झालेलं पाहायला मिळत आहे. मालिकेतही तितीक्षा म्हणजेच नेत्रावर देवीचा हात असतो. देवीच्या आशीर्वादाने नेत्रा विरोचकांविरोधात लढा देताना दिसत आहे. त्यामुळे तितीक्षाने गळ्यात घातलेलं हे खास सरस्वतीच्या गळ्यातील मंगळसूत्र अधिक चर्चेत आलं आहे.