‘ढाई किलो का हात’ असे वाक्य कानावर पडलं की अभिनेता सनी देओलचं नाव समोर येतं. २००१ साली सनी व अमीषा पटेल यांचा ‘गदर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला खूप लोकप्रियतादेखील मिळाली होती. २३ वर्ष उलटून गेली तरीही या चित्रपटाची जादू कमी झाली नाही. अशातच २०२३ साली ‘गदर’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपटदेखील खूप पसंत केला गेला आणि सनी पुन्हा एकदा चर्चेत आला. पण आता सनी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सनीवर एका निर्मात्याने गंभीर आरोप केले आहेत. (sunny deol fraud case)
सनीवर तब्बल २.५५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. रियल इस्टेट डेव्हलपर व निर्माता सौरव गुप्ता यांनी सनी देओलवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. ते सनडॉन एंटरटेरमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आहेत. त्यांनी सनी विरोधात फसवणूक व जबरदस्तीने वसूली करण्याचे आरोप केले आहेत. सौरव यांनी सांगितले की, “मे २०१६ मध्ये त्यांनी त्यांचा चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट घेऊन सनीकडे पोहोचले होते. ते ४ कोटी रुपयांमध्ये चित्रपट करण्यासाठी तयार झाले. तसेच १ कोटी रुपयेदेखील आगाऊ रक्कम म्हणून देऊ केले. त्यानंतर अजून पैसे मागितल्यानंतर तेदेखील देऊ केले. पण त्यांनी शूट सुरु न करता त्यांनी ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघून गेले”.
पुढे त्यांनी सांगितले की, “२०२२ साली अशीच टाळाटाळ सुरु होती. सनीने चित्रपटाचा दिग्दर्शक बदलून स्क्रिप्टवर पुन्हा काम करण्यास सांगितले. तसेच आम्हाला 2023 साठी एक विषय सुचवला होता. चित्रपटाचे नाव होते ‘रामजन्मभूमी’. आम्हाला सांगण्यात आले की स्क्रिप्ट तयार आहे, एक दिग्दर्शक आहे आणि आम्हाला फक्त ते कार्यान्वित करायचे आहे. चित्रपटाचे एकूण बजेट अंदाजे 40 कोटी रुपये आहे, जे 50-50 टक्के आमच्या आणि दुसऱ्या पार्टनरमध्ये विभागले जाईल”.
नंतर सौरव यांनी सांगितले की, “आम्ही यासाठी ‘फिल्मीस्तान स्टुडिओ’देखील बुक केला होता. इतरांनादेखील आम्ही पैसे देऊ केले. त्यानंतर चित्रपट नक्की बनेल असेही सनीने आश्वासन दिले. पण त्यांनी नंतर सांगितले की सनीची फी वाढवण्यात आली आहे. तसेच मुलाच्या लग्नाच्यावेळी देखील ५० लाख रुपये मागितले गेले. तेदेखील आम्ही देऊ केले. त्यानंतर आम्ही एक करार केला”.
पण जेव्हा सौरव यांच्या हातात कराराची हार्ड कॉपी आली तेव्हा त्यामध्ये लिहिले होते की, “सनीची फी वाढून आठ कोटी करण्यात आली होती. तसेच चित्रपटाला जो नफा होईल त्यातून डोन कोटी रुपयेदेखील घेतले जातील. त्यानंतर मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण समोरून काहीच उत्तर आले नाही. या प्रोजेक्टसाठी आम्ही तब्बल २५ कोटी रुपये खर्च केले. त्यातील २.५५ कोटी रुपये सनीला दिले होते.”
या प्रकरणावर सनीने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण या प्रकरणाला नेमके कोणते वळण लागणार हे आता पाहाण्यासारखे आहे.