‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ ही वेबसिरिज सध्या खूप चर्चेत आहे. या वेबसिरिजच्या माध्यमातून अनेक नवीन चेहरे समोर आले काही जुने चेहरे खूप वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आले. सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक व संगीतकार संजयलीला भन्साळी यांनी या वेबसिरिजचे दिग्दर्शन केले आहे. मनीषा कोइराला, शेखर सुमन, फरदीन खान असे अनेक जुने कलाकार पुन्हा या सिरिजच्या निमित्ताने समोर आले आहेत. पण या सगळ्यांमध्ये भाव खाऊन गेली ती अदितीराव हैदरी. अदितीने या सिरिजमध्ये बिब्बोजान ही भूमिका साकारली आहे. या सिरिजमध्ये तिचे सौंदर्य खूपच खुलून दिसत होते. (aditi rao haidri old photo)
एक सुंदर व चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून अदिती हैदरीचं नाव घेतलं जातं. आजपर्यंत तिने अनेक तेलगू, तमिळ, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण ‘हिरामंडी’ या सिरिजमधील भूमिका विशेष गाजली. विशेषतः तिने सादर केलेल्या एका गाण्यातील ‘गजगामिनी वॉक’ अधिक व्हायरल झाले. तिच्या सौंदर्याचीही खूप स्तुती करण्यात आली. पण आदितीचे करियरमधील सुरुवातीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने आदितीचा २००६ सालचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिचा लूक खूपच वेगळा दिसत आहे.

हा फोटो समोर येताच आदितीने प्लॅस्टिक सर्जरी केल्याचे सर्वजण म्हणत आहेत. तसेच फोटोवर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या. एका नेटकऱ्याने म्हंटले की, “एवढी प्लॅस्टिक सर्जरी?” तसेच दुसरा नेटकरी तिच्या बाजूने म्हणाला की, “गल्लीतल्या काकू का बनत आहात? केली असेल तर त्यात एवढ काय आहे?”, तसेच अजून एक नेटकरी म्हणाला की, “जी आधीपासून इतकी सुंदर आहे तिच्याबद्दल काहीही बोलणं बरं वाटत नाही”, तसेच अजून एका नेटकऱ्याने सांगितले की, “केवळ नाकाचीच सर्जरी केली आहे. त्यामुळे उगाच त्याचा बाऊ करू नका”.
अदितीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती अनेक ‘हिरामंडी’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. पुढेही अनेक चित्रपटांममध्ये दिसून येईल.