ओटीटीवरील पंचायत या सीरिजने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केलं आहे. २०२० साली या सीरिजचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गावची पार्श्वभूमी असलेल्या आणि काहीतरी नवीन विषय असल्याने या सीरिजला खूप पसंती मिळाली होती. पहिल्या सीझनच्या यशानंतर २०२२ साली दूसरा सीझनदेखील प्रदर्शित करण्यात आला होता. यालादेखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अशातच आज या सीरिजचा तिसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या सीरिजची लोकप्रियता इतकी आहे की, पहिल्याच दिवशी सीरिजच्या चाहत्यांनी या सीरिजला डोक्यावर घेतले आहे. सीरिज प्रदर्शित होताच सीरिजला भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे ‘पंचायत-३’बद्दल त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सीरिजबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त करत ‘पंचायत-३’चे कौतुक केले आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडियावरुन प्रेक्षकांनी त्यांच्या सीरिजबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Finished #Panchayat Season 3 in one night and here is my view.
— #RahulAggarwal (@ImRahulAggarwal) May 27, 2024
Panchayat Season 3 has once again proven why it stands out as one of the finest examples of Indian web series storytelling. Every single scene capture the essence of rural India with its heartfelt narrative and… pic.twitter.com/DAsk3uozI3
या सीरिजचे कौतुक करत एकाने असं म्हटलं आहे की, “‘पंचायत-३’ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ती भारतीय वेब सिरीज कथाकथनाच्या उत्कृष्ट उदाहरणांपैकी एक आहे. प्रत्येक दृश्य आपल्या हृदयस्पर्शी कथा आणि उत्तम पात्रांसह ग्रामीण भारतावर ही सीरिज भाष्य करते. नेहमीप्रमाणे, दीपक कुमार मिश्रा काहीतरी नवीन घेऊन आले आहेत. पहिल्या दोन सीझनप्रमाणेच या सीझनमध्येही तुम्हाला प्रत्येक पात्र लक्षात राहील. विशेष म्हणजे फैसल मलिक; त्याचे संवाद कमी पण दमदार आहेत आणि जेव्हा तो पडद्यावर येतो तेव्हा दृश्य तीव्र होते”.
wait is over..🥹🥹 finally my favorite web series Panchayat season 3 came today and I also watched it. It is better and more emotional than the first and second season. All of you must watch Panchayat season 3 on Amazon Prime.😭😭😭♥️♥️💖💖💖💖💖💖💖💖💖 pic.twitter.com/B1rN5EGGkJ
— Deepak Shekhawat🌸 (@Over_Thinkkerr) May 28, 2024
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या भावाची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या पारंपरिक विधींने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल
तर आणखी एका चाहत्याने सीरिजबद्दल आपल्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “अखेर प्रतीक्षा संपली. शेवटी माझी आवडती वेबसीरिज ‘पंचायत-३’ आज आली आणि मी ती पाहिलीदेखील. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनपेक्षा हा सीझन खूपच चांगला आणि भावनिक आहे. सर्वांनी ही सीरिज नक्की पाहा.” तसेच अनेकांनी पहिल्या दोन्ही सीझनपेक्षा हा तिसरा सीझन अधिक चांगला असल्याचे म्हटले आहे.
नया सचिव आ गया है, और विधायकजी का हाथ है सिर पर, और आते ही मिल लिया बनराकस से😬😬#Panchayat pic.twitter.com/p5HqfcIy0d
— अश्विन उपाध्याय (@AshwinUpadhyay_) May 28, 2024
दरम्यान, या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, सान्विका, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, अशोक पाठक, फैसल मलिक आणि सुनीता राजवार आदी कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आजपासून ‘पंचायत-३’ ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.