शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नेत्राआधीच पाचवी पेटी शोधण्यासाठी रुपाली घराबाहेर, विरोचकामुळे गावकऱ्यांना धोका, कोणाला यश मिळणार?  

Saurabh Moreby Saurabh More
मे 28, 2024 | 3:18 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update Virochak and Netra-Adwait visit deviaai village of Vavoshi.

नेत्राआधीच पाचवी पेटी शोधण्यासाठी रुपाली घराबाहेर, विरोचकांमुळे गावकऱ्यांना धोका, कोणाला यश मिळणार?

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एकामागून एक येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका दिवसेंदिवस अधिकच रंजक होत आहे. मालिकेत नुकतंच विरोचकाने राजाध्यक्ष कुटूंबातील केतकी काकु, फाल्गुनी, शेखर, तन्मय व तेजस या सर्वांना वश केले असल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता तिच्या वशमधून हे सगळेच बाहेर आले आहेत आणि घरातील सर्व जण पाचव्या पेटीचा शोध घेत आहेत. त्यामुळे या पेटीच्या शोधात राजाध्यक्ष कुटुंबातील सर्वजण वावोशी गावाकडे निघाले आहेत.

विरोचकाला राजाध्यक्ष शोधत असलेल्या पाचव्या पेटीबद्दलही माहिती होत आहे. राजाध्यक्ष यांच्या घरी भविष्य सांगणारे येतात आणि ते देवीआईच्या कळसाबद्दल बोलत असतात. यावरून पाचवी पेटी देवीआईच्या त्या कळसात असण्याविषयीची माहिती विरोचकाला मिळते आणि ती त्या पेटीच्या शोधात वावोशी गावात पोहोचली आहे. अशातच नेत्राला विरोचक वावोशी गावकऱ्यांना व नेत्राच्या बाबांना काही इजा करेल की काय? अशी चिंता लागून राहिली आहे. विरोचकाला पाचवी पेटी मिळण्यापेक्षा विरोचकाने कुणाला काय करू नये यामुळे नेत्रा चिंतेत पडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : ‘सातव्या मुलीची…’चे सीन खऱ्याखुऱ्या जंगलात कसे होतात शूट?, भर उन्हातही कलाकार घेत आहेत अशी मेहनत, BTS व्हिडीओ समोर

तर दुसरीकडे इंद्राणी व शेखर रुपालीच्या आधीच वावोशी गावात पोहोचले असतील असं म्हणताना दिसत  आहेत. विरोचक वावोशी गावात गेल्यामुळे देवीआईनेच त्याला त्या गावात बोलावले असणार आणि देवीआई आता विरोचकाचा अंत करणार असं या प्रोमोद्वारे सुचवण्यात आले आहे. तसेच या प्रोमोमध्ये जशी शिकार जाळ्यामध्ये अडकते तसंच विरोचकही देवीआईच्या देवळाकडे स्वत:हुनच जात आहे” असं म्हणताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – लग्न लागताच मागितला घटस्फोट; नव्या मराठी मालिकेची घोषणा होताच प्रोमोने वेधलं लक्ष, कथेमध्ये काय नाविन्य असणार?

त्यामुळे विरोचकाचा अंत नक्की नेत्राच्या हातून होणार की देवीआई विरोचकाचा अंत करणार?, आता रुपालीच्या वशीकरणाच्या शक्तीतून बाहेर आल्यानंतर राजाध्यक्ष कुटुंबियांना पाचव्या पेटीचा शोध लागणार का? यात नेमकं काय दडलेलं असणार? वावोशी गावात जाताच विरोचक नक्की काय करणार? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर विरोचक वावोशी गावकऱ्यांना काही करणार की नाही? ही नेत्राची भीती खरी ठरेल का? याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.   

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tharal Tar Fame chaitanya and sakshi dance

Video : 'ठरलं तर मग'मधील साक्षी-चैतन्यचा सेटवर धिंगाणा, माधुरी दीक्षितच्या गाण्यावर भन्नाट डान्स अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.