‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, नागराजला घेऊन प्रिया शवाघरात येते आणि तिथे नागराज प्रतिमासाठी एक बॉडी फायनल करतो. त्यानंतर नागराजन तेथील एका वॉर्ड बॉयला उद्या फोन केल्यावर ती बॉडी घरी घेऊन यायचं सांगतो. तर एकीकडे सायली शिवानी जाधवच्या घरी जाऊन तिला समजावून सांगते. आणि सायलीला आपल्या घरी यायला तयार करते. दुसरीकडे झोपेतून उठल्यावर समोरच कोर्टात केससाठी हजर राहण्याची नोटीस साक्षीला दिसते, म्हणून मदत मागण्यासाठी ती लगेच नागराजला फोन लावायचा प्रयत्न पण नागराजचा फोन बंद येतो. (Tharal Tar Mag Serial Update)
दुसरीकडे चैतन्यला साक्षी कोर्टात हजर राहण्याच्या नोटीसबद्दल सांगते. त्यावर चैतन्य काळजी न करता शांत रहायला साक्षीला सांगतो आणि उद्याच्या सुनावणीच्या तयारीला सुद्धा लागायचं असं सांगतो. दुसरीकडे अर्जुनला रविराज फोन करून केससाठी हजर राहण्याच्या नोटीसबद्दल सांगतो. त्यावर अर्जुन आश्रम केससंदर्भात काही महत्वाचे पुरावे हाती लागल्याचे रविराजला सांगतो.
तर शिवानी जाधव कोर्टात खरी साक्ष द्यायला तयार असल्याचं सायलीला सांगते. सायली लगेच ही गोष्ट अर्जुनला फोन करून कळवते. आणि तिला घरी घेऊन येण्याबाबतही सांगते. मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की, अर्जुन आणि सायली शिवानी जाधवला घरी घेऊन येतात. अर्जुन शिवानी ही सायलीची मैत्रीण असल्याचं घरच्यांना सांगतो.
आणखी वाचा – ‘आठवी-अ’च्या कलाकारांचा कराड, सांगलीमध्ये हाऊसफुल्ल शो, चाहत्यांची तुफान गर्दी
त्यानंतर सायली पुर्णा आजीची शिवानीला एका रात्रीसाठी इथे राहण्याबद्दल परवानगी मागते. त्यावर त्या परवानगी देतात. शिवानी घरात वावरत असताना अचानक सुभेदारांकडे प्रिया येते आणि ती शिवानीला पाहते. आता शिवानीला पाहिल्यानंतर प्रिया याबाबतची चुगली साक्षीकडे करणार का?, अर्जुनला मिळालेला पुरावा तो कोर्टात सादर करणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.