‘बिग बॉस १७’ मधून मुन्नावर फारुकी खूप चर्चेत आला. काही दिवसांपूर्वी तो रुग्णालयात दाखल झाला होता. त्यावेळी त्याच्या चाहत्यांना खूप काळजी वाटली होती. त्याचे रुग्णालयात दाखल झाल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ‘बिग बॉस’मधील त्याच्या परफॉर्मन्सने सर्वांचीच मने जिंकून घेतली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी तो मन्नारा चोप्राबरोबरदेखील दिसून आला. त्यावेळी दोघांच्या नात्यावरदेखील खूप चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आला आहे. (Munawar Faruqui second marriage)
स्टँडअप कॉमेडियन मुन्नावर पुन्हा एकदा चर्चेत आला. पण आता त्याने १० ते १२ दिवसांपूर्वी दुसरं लग्न केल्याच्या चर्चा सुरु झाल्या. तसेच त्याच्या लग्नात मुन्नावरचे जवळचे नातेवाईक व मित्र-मंडळी हजर होते. ‘टाइम्स नाऊ’च्या रिपोर्टनुसार, सोशल मीडियाच्या पेजवर मुन्नावरच्या लग्नाबद्दल चर्चा सुरु झाल्या. या रिपोर्टमध्ये सांगितले आहे, “होय. मुन्नावरने लग्न केले आहे. हे वृत्त त्यांना बाहेर येऊ द्यायचे नाही आहे. त्यामुळे दोघांचे खास फोटो अजूनही समोर येणार नाहीत”.
मुन्नावरने ज्या मुलीबरोबर लग्न केले तिचे नाव महजबी कोटवाला आहे. ती मेकअप आर्टिस्ट आहे. तसेच रिपोर्ट्सनुसार, मुन्नावरने गुपचुप लग्न केले. तसेच रिसेप्शन पार्टी २६ मे २०२४ रोजी आइटीसी ग्रँड मराठामध्ये ठेवण्यात आले होते. या रिसेप्शन सोहळ्यासाठी हिना खानदेखील उपस्थित होती. काही दिवसांपूर्वी हिनाने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती लग्नसोहळ्यासाठी उपस्थित असलेली दिसली. त्यामुळे तीदेखील लग्नामध्ये सहभागी असल्याचा अंदाज बांधला.
मुन्नावर हा घटस्फोटित आहे. तसेच त्याला एक मुलगा आहे. जॅस्मिन व मुन्नावर यांनी २०१७ साली लग्न केले होते. तसेच २०२२ साली दोघांचा घटस्फोट झाला. ‘बिग बॉस १७’ मध्ये आयेशा खानने मुन्नावरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप खुलासे केले. तिने सांगितले की की जेव्हा मुन्नावरला डेट करत होता तेव्हा तो इतर मुलींनादेखील डेट करत होता. त्यानंतर त्याच्याबद्दल खूप चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीमध्ये किती तथ्य आहे हे पाहण्यासारखे आहे.