झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमाने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या कार्यक्रमामधील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडेसह अंकुर वाढवे आणि अनेक कलाकारांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमामुळे अभिनेता सागर कारंडेही चांगलाच लोकप्रिय झाला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर सागरने काही नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच त्याने काही विनोदी कार्यक्रमातून प्रहसन सादर करत प्रेक्षकांना हसवले. अशातच प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर कुशल आता सागर पुन्हा एकदा एका हिंदी विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सागर सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या विनोदी कार्यक्रमामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस १७’ फेम मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल, फोटोमुळे चर्चांना उधाण, नेमकं झालंय काय?
नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून या प्रोमोमध्ये सागर कारंडेची खास झलक पाहायला मिळत आहे. सागरने याआधी अनेकदा विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच त्याने याआधीही ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ या हिंदी विनोदी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यामध्ये सागर कारंडेसह अभिनेता भारत गणेशपुरेही होता. ‘चला हवा येऊ द्या’नंतर या दोघांनी ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ या कार्यक्रमामधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.
अशातच आता सागर पुन्हा एकदा हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, ‘मॅडनेस मचायेंगे’ या विनोदी कार्यक्रमात कुशल बद्रिके, हेमांगी कवी, त्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेही सहभागी झाला होता. अशातच आता यांच्यात सागर कारंडेही सहभागी झाला आहे. त्यामुळे सागरचे अनेक चाहते त्याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.